पोलीस अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:24 AM2019-07-25T00:24:10+5:302019-07-25T00:24:28+5:30
स्व-विकासासाठी कैझेन जपानी व्यवस्थापन प्रणालीचा प्रयोग करावा, असे प्रतिपादन कीर्तनकार डॉ. संदीप भानोसे यांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यशाळेप्रसंगी केले.
सातपूर : स्व-विकासासाठी कैझेन जपानी व्यवस्थापन प्रणालीचा प्रयोग करावा, असे प्रतिपादन कीर्तनकार डॉ. संदीप भानोसे यांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यशाळेप्रसंगी केले.
ग्रामीण पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. भानोसे यांनी पुढे सांगितले की, जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या प्रगत शहरांवर अणुबॉम्बच्या प्रयोगानंतर जपान उद्ध्वस्त झाले. त्यानंतर जपानने प्रगती करण्यासाठी स्वत:ची कैझेन व्यवस्थापन पद्धती विकसित केली व प्रगती केली. कैझेन पद्धतीचा वापर अनेक देशात केला जातो. कै म्हणजे चांगल्यासाठी व झेन म्हणजे बदल परिवर्तन. पोलीस कर्मचाºयांनी स्वविकासासाठी कैझेनचा प्रयोग रोज करावा, असेही भानोसे यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे- वालावलकर, सुरेश जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन योगेश नाईक यांनी केले. रामदास डंबाले यांनी आभार मानले.