जेएटी महिला महाविद्यालयात ‘रोड सेफ्टी अँड सायबर क्राईम’ या विषयावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:13 AM2021-02-08T04:13:55+5:302021-02-08T04:13:55+5:30
वाहतुकीचे नियम व त्याचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारून होते. शहर वाहतूक ...
वाहतुकीचे नियम व त्याचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारून होते. शहर वाहतूक निरीक्षक बशीर शेख यांनी मार्गदर्शन केले. मानवी निष्काळजीपणा हा अपघाताला प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भगीरथ सोनवणे यांचेही भाषण झाले. प्राचार्य डॉ. हारून अन्सारी यांनी विद्यार्थिनींना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. डॉ. रूमाना खान यांनी प्रास्ताविक केले. डॉ. साजेदा शेख यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाला डॉ. सलमा अब्दुल सत्तार, प्रा. मुनवर अहमद, डॉ. फहमिदा अन्सारी, डॉ. लोधी कनीज फातिमा, प्रा. सुनीता देसले यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
===Photopath===
070221\07nsk_32_07022021_13.jpg
===Caption===
मालेगावी जेएटी महिला महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख. समवेत प्राचार्य डॉ. मो. हारुण अन्सारी, प्रा. सुनेत्रा मेश्रामकर, भगीरथ सोनवणे, डॉ. रूमाना खान आदि.