एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:26 PM2020-01-30T22:26:13+5:302020-01-31T00:59:51+5:30
वाहनांच्या धुरामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून, हा चिंतेचा विषय आहे. यावर विद्युत हायब्रीड वाहनांचा पर्याय पुढे येत आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आगामी काळात मोठ्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे अभ्यास व करिअर अशा दोन्ही बाजूंनी या विषयाकडे पहावे, असे प्रतिपादन नागपूर येथील व्हीएनआयटी महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. प्रद्युम्न चतुर्वेदी यांनी केले.
येवला : वाहनांच्या धुरामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून, हा चिंतेचा विषय आहे. यावर विद्युत हायब्रीड वाहनांचा पर्याय पुढे येत आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आगामी काळात मोठ्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे अभ्यास व करिअर अशा दोन्ही बाजूंनी या विषयाकडे पहावे, असे प्रतिपादन नागपूर येथील व्हीएनआयटी महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. प्रद्युम्न चतुर्वेदी यांनी केले.
बाभूळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘विद्युत हायब्रीड वाहनात उदयोन्मुख कल’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी चतुर्वेदी बोलत होते. व्यासपीठावर नाशिकच्या एसव्हीआयटी महाविद्यालयाचे डॉ. मुकेश कुमावत, कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्युत विभागप्रमुख प्रा. डी. बी. परदेशी, जगदंबा शिक्षण संस्थेचे सचिव लक्ष्मण दराडे व एसएनडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. कुदळ उपस्थित होते.
प्रमुख व्याख्याते प्रा. डी. बी. परदेशी यांनी विद्युत हायब्रीड वाहनांची आजची आवश्यकता व त्यामुळे भविष्यात होणारे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. तर डॉ. मुकेश कुमावत यांनी तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान दिले. इंदूर येथील आयआयटी महाविद्यालयाचे डॉ. आमोद उमरीकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहजसुलभ विद्युत हायब्रीड वाहन बनविण्यासाठीचे आवाहन यावर मार्गदर्शन केले. पूनम दौंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर अमित सोलंकी यांनी आभार मानले.