लासलगाव महाविद्यालयात कार्यशाळा यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:47 PM2019-01-02T17:47:14+5:302019-01-02T17:48:22+5:30
लासलगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन, अध्ययन व विस्तार विभागातर्गत नुकतीच तीन दिवशीय कार्यशाळा पार पडली.
लासलगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन, अध्ययन व विस्तार विभागातर्गत नुकतीच तीन दिवशीय कार्यशाळा पार पडली.
सदर कार्यशाळेत महिला सबलीकरण, आहार व आरोग्य तसेच स्पर्धात्मक परीक्षा या विषयांवर तज्ञांची व्याख्याने पार झाली. उपप्राचार्य डॉ. रोहिदास पाटील यांनी कार्यशाळेचे उदघाटन केले. महिला सबलीकरण या विषयावर डॉ. वैशाली जाधव आणि प्रा. रमेश इंगोले यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी स्त्रियांनी शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवे,
आत्मविश्वास व स्वावलंबन हि मुल्ये अंगीकारून आर्थिक दृष्ट्याही ती स्वतंत्र हवी. आहार आणि आरोग्य या विषयावर डॉ. अरु ण काळे व डॉ. सीमा डेर्ले यांनी आपले विचार व्यक्त केले. काळानुरूप आहार-विहाराच्या सवयी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. त्या प्रमाणे यंत्राच्या अवाजवी वापरामुळे शरीराची हालचाल मंदावली जाते. बारीक होण्याच्या आकर्षणापोटी युवावर्ग समतोल आहार घेताना दिसत नाही. रसायनांचा वापर केलेल्या भाज्या,धान्ये, पिकवल्या जातात. यामुळेही आरोग्य बिघडते. चांगल्या आहार- विहाराच्या सवयी दोन्ही तज्ञांनी सांगितल्या.
तसेच स्पर्धात्मक परीक्षा या विषयावर प्रा. गोकुळ शिंदे, तेजल आहेर, यांनी अत्यंत उपयुक्त व प्रभावी माहिती दिली विविध राज्य व केंद्र सरकारच्या सेवेतील पदांबाबतची पात्रता, पाठ्यक्र म, अभ्यास पद्धती, प्रश्नांचे स्वरूप याचे प्रभावी विश्लेषण करीत विद्यार्थाना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी चालना दिली. तीन दिवशीय कार्यशाळेचे संयोजन डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रतिभा जाधव, प्रा. सोमनाथ आरोटे, यांनी करून दिला. आभार प्रा. किशोर अंकूळनेकर यांनी मानले. यावेळीे विद्यार्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.