सटाण्यात स्वाइन फ्लू रोखण्यासाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:19 PM2018-09-25T13:19:58+5:302018-09-25T13:20:41+5:30
सटाणा : स्वाइन फ्लू तसेच येत्या १४नोव्हेंबर पासून सुरु होणाºया गोवर रूबेला लसीकरण मोहिमेच्या पाशर््वभूमीवर येथे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.तहसीलदार प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. बागलाण तालुक्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. या आजाराची लागण झालेले अनेक रु ग्ण आढळून येत असल्यामुळेसर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा घेण्यात आली.खासगी डॉक्टरांनी शासनाच्या दिलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार ए,बी,सी असे वर्गीकरण करून बी व सी वर्गातील रु ग्णांना तत्काळ कॅप्सूल टमिफ्यू देण्यात यावे तसेच स्वाइन फ्लू सदृश्यरु ग्ण आढळल्यास अशा रु ग्णांना तत्काळ सटाणा ग्रामीण रु गणालय अथवा जवळच्या प्राथमिक आरीग्य केंद्रात भरती करावे असे आवाहन करण्यात आले.तालुक्यातील सर्वच शासकीय रु ग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून अशा रु ग्णांनी घाबरून न जाता शासकीय रु ग्णालयातच औषधोपचार करावेत असे आवाहनही तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले. दरम्यान येत्या १४ नोव्हेंबर पासून ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना गोवर ,रु बेला लसीकरण मोहिमेस सुरवात करण्यात येणार आहे.पालकांनी बालकांना नजीकच्या शासकीय रु ग्णालयात जाऊन लस टोचून घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत अहिरराव यांनी केले.या कार्यशाळेत गटविकास अधिकारी महेश पाटील ,डॉ.विलास बच्छाव ,वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेंद्रे ,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी मार्गदर्शन केले.