लोहोणेर शाळेत किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:01 AM2020-01-24T00:01:56+5:302020-01-24T00:52:30+5:30
शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत किशोरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. या मुलींना वयाबाबतचे शास्रीय ज्ञान व आरोग्यविषयक माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतची शास्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. वैशाली निकम यांनी केले.
लोहोणेर : शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत किशोरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. या मुलींना वयाबाबतचे शास्रीय ज्ञान व आरोग्यविषयक माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतची शास्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. वैशाली निकम यांनी केले.
कळवण उपजिल्हा रु ग्णालय व लोहोणेर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालय, लोहोणेर येथे किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ. कविता पवार, डॉ. भाग्यश्री बच्छाव, डॉ. धनश्री देवरे, डॉ. सायली आहेर, पर्यवेक्षिका कल्पना काळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यशाळेत मासिक पाळीबाबत असणारे मुलींचे समज-गैरसमज, किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, योग्य आहार, आरोग्याशी निगडित समस्या यावर सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्र म यशस्वी होण्यासाठी शीतल जाधव, अनिता पाटील, शारदा पवार, अश्विनी मुंदानकर, स्मिता वाघ, मनीषा गिरासे, अनिता सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.