महिला सबलीकरण व कायदा साक्षरता विषयावर वाघ महाविद्यालयात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 05:59 PM2020-02-11T17:59:22+5:302020-02-11T17:59:36+5:30
चांदोरी : आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने वाघ महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
चांदोरी : आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने वाघ महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या सत्रात ‘महिला सबलीकरण’ या विषयावर डॉ. आश्लेषा कुलकर्णी म्हणाल्या, आज स्त्रियांना सर्वच क्षेत्रात करियर करण्याची संधी उपलब्ध झालेली आहेत. त्याचा विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा व सामाजिक, शैक्षणिक दृष्टया सक्षम झाले पाहिजे.
दुसरे पुष्प गुंफताना डॉ. मनीषा नवरे यांनी विविध कोर्सेसची माहिती दिली. स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ‘कायदा साक्षरता’ या विषयावर डॉ. मेधा सायखेडकर यांनी कायद्याविषयी माहिती देताना महिला सुरक्षतेसंबंधी कायदे असून स्त्रियांचा मानसिक, शारीरिक, लैंगिकछळ थांबविता येईल. कोणताही कायदा हा उत्कृष्ट समाजाच्या उभारणीसाठी असतो. त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच अॅड. शिवराज नवले यांनी विविध कायदे सांगून घडलेल्या अनेक घटना समाजविघातक असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्र माचे समन्वयक प्रा. सिमा भालेराव यांनी संयोजन केले. प्रा. वृषाली जाधव यांनी सूत्रसंचालन, तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सविता भंडारे यांनी करून दिला. प्रा. तुषार बागुल यांनी आभार मानले.