धोंडमाळला महिलांची घेतली कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 06:38 PM2020-07-01T18:38:43+5:302020-07-01T18:39:55+5:30
पेठ : तालुक्यात विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ झाला. पंचायत समितिी सभागृहात जि.प. सदस्य भास्कर गावीत यांचे हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पेठ : तालुक्यात विविध उपक्र मांनी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ झाला. पंचायत समितिी सभागृहात जि.प. सदस्य भास्कर गावीत यांचे हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सभापती विलास अलबाड, उपसभापती पुष्पा पवार, तुळशिराम वाघमारे, पुष्पा गवळी, शामराव गावीत, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे आदी उपस्थित होते.
कृषी संजीवनी सप्ताहातंर्गत ग्रामपंचायत धोंडमाळ येथे विशेष महिला शेती शाळा घेण्यात आली. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांच्या उपस्थितीत शेतकर्यांना खरीप हंगामातील विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन भात रोपवाटीका, पिकावरील कीड, किडीचे व्यवस्थापन, विविध कृषी योजना, बीजोत्पादन, मिश्र फळबाग लागवड आदींची माहीती देण्यात आली. कृषी शास्त्रज्ञ डॉ. हेमंत देशमूख यांनी महिला शेतकर्यांना मार्गदर्शन केले. हिरवळीचे जास्तीत जास्त खत मिळावे यासाठी बांधावर गिरीपुष्प लागवड करण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडळ अधिकारी श्रीरंग वाघ, संजय साबळे, कृषी सहाय्यक विकास गडाख, सरपंच जयवंती वाघमारे, रामजी वड, देवकी शेवरे, रघूनाथ प्रधान, भागवत वाघमारे, भास्कर वाघमारे, दिलीप शेवरे, नामदेव बोके, ग्रामसेवक भूषण लोहार, भगवान रानडे, मधुकर कामडी, संतोष कडाळी यांचे सह शेतकरी उपस्थित होते.