जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:19 AM2018-04-28T00:19:29+5:302018-04-28T00:19:29+5:30
गाव पाणीदार करण्याच्या ईर्ष्येला पेटलेल्या ग्रामस्थांच्या हातात हात देऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचायांनी श्रमदान करत सिन्नर तालुक्यातील वडझिरे परिसरातील भूजल पातळीत ५० लाख लिटर पाणीसाठ्याची व्यवस्था होईल एवढे काम एका दिवसात करून ग्रामस्थांनी घेतलेल्या तुफानाच्या उडीला साद देण्याचे कौतुकास्पद काम केल्याची चर्चा नायगाव खोºयात होत आहे.
नायगाव : गाव पाणीदार करण्याच्या ईर्ष्येला पेटलेल्या ग्रामस्थांच्या हातात हात देऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचायांनी श्रमदान करत सिन्नर तालुक्यातील वडझिरे परिसरातील भूजल पातळीत ५० लाख लिटर पाणीसाठ्याची व्यवस्था होईल एवढे काम एका दिवसात करून ग्रामस्थांनी घेतलेल्या तुफानाच्या उडीला साद देण्याचे कौतुकास्पद काम केल्याची चर्चा नायगाव खोºयात होत आहे. शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषेदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्यासह सर्व खातेप्रमुख व आरोग्य, शिक्षण, ग्रामसेवक, पंचायत समितीचे सर्व चारशे कर्मचाºयांनी वडझिरे येथे सकाळी ६ वाजता श्रमदानास सुरुवात केली. एका दिवसात ५० सीसीटी निर्माण केल्या आहे. या खोदलेल्या कामामुळे वडझिरे परिसरातील भूजल पातळीत तब्बल ५ लाख लिटर पाण्याचा साठा होणार असल्याचे जलमित्र जयराम गिते यांनी सांगितले. गाव करील ते राव काय करील.. अशा आशयाची म्हण सुपरिचित आहे. या म्हणीप्रमाणे पाचविला पुजलेला दुष्काळ हद्दपार करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावाने गट-तट बाजूला सारून पानी फाउण्डेशनच्या सुराला श्रमाची साद घालत गाव पाणीदार करण्याची शपथ घेऊन लेकराबाळांसह एकत्र येत आमीर खानच्या तुफानात उडी घेतली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेल्या पानी फाउण्डेशनच्या वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून वडझिरेकरांच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी गावातील सर्वच गट-तट बाजूला सारून पाण्याच्या तुफानात उडी घेतली आहे. तीन वर्षापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव आदर्श करण्याला पानी फाउण्डेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांचे एकीचे बळ मिळाल्याने गाव आता खºया अर्थाने पाणीदार होण्याच्या नजीक पोहचल्याची चर्चा परिसरात होत आहे. ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने या योजनेत सहभागी होऊन प्रत्यक्षात शिवार फेरी करून कामाची रूपरेषा ठरवत कामाचा शुभारंभ केला. ग्रामस्थांनी परिसरात दगडी बंधारे, शोषखड्डे, पाच हजार रोपवाटिका निर्माण करत स्पर्धेत गावाला १७ गुण मिळवून दिले आहे. त्यामुळे जैन संघटनेतर्फे जेसीबी व पोकलेन आदी यंत्रणा उपल्बध करून दिले आहे. ग्रामपंचायत, सीएसआर व अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गावात अनेक आदर्शवत कामे झाली आहेत. ग्रामविकास समितीने काही वर्षांपासून सुरू केलेल्या पाणी आडवा, पाणी जिरवा या कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर शासनाच्या जलयुक्त शिवारचे कामही मोठ्या प्रमाणात झाले आहे. आणि आता होत असलेल्या पानी फाउण्डेशनच्या कामामुळे वडझिरे गाव खºया अर्थाने पाणीदार होण्याच्या समीप पोहचले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.