बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:02 AM2018-05-17T01:02:06+5:302018-05-17T01:02:06+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित बालमृत्यू अन्वेषण कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बालमृत्यू अन्वेषण कार्यशाळा गरोदर माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच बालमृत्यू अन्वेषणाचा छापील नमुना भरण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना डॉ. गिते यांनी प्रत्येक डॉक्टरांनी आपली मानसिकता बदलून जर रुग्णाविषयीचा कठोरपणा कमी केला तर नक्कीच बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन केले. सत्य हे कायम महत्त्वाचे असते. याबाबत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय यांना त्यांच्या बालमृत्यू अहवालाबाबत विचारणा केली असता खरे बोलले तर कोणतीही कारवाई होणार नाही असे बोलले असता तालुका आरोग्य अधिकारी सुरगाणा, कळवण, नाशिक यांनी त्यांच्या तालुक्याची माहिती दिली. याबाबत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सीटीसी सुरू करावयाची आहे तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे ग्राम बालविकास केंद्राबाबतचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्णसंपर्क), अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधीक्षक (ग्रामीण रुग्णालय), तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.डॉ. गिते यांनी बालमृत्यू अन्वेषणाचा छापील नमुना बालमृत्यू झाल्यास त्वरित भरावा, तसेच जर बाल अन्वेषण नमुन्यात आपल्या जिल्ह्याबाबत काही अतिरिक्त माहिती समाविष्ट करावयाची असल्यास तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी समिती स्थापन करून सदरच्या पूर्ण छापील नमुन्यात बदल करून आॅनलाइन करण्यात यावा. अन्वेषामध्ये त्याबाबत लक्ष देऊन सदरचा पूर्ण छापील नमुना आॅनलाइन करून घेऊन त्यामध्ये रस्ते, औषधे वगैरेंबाबत समस्या असल्यास त्या कशा दूर होतील याबाबतची अतिरिक्त माहिती अद्ययावत करावी, असे सांगितले.