कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातर्फे कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:07 AM2017-11-04T01:07:38+5:302017-11-04T01:07:47+5:30

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालय व अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या वतीने उद्योजक व कामगारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Workshops by the Employees Provident Fund Organization | कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातर्फे कार्यशाळा

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातर्फे कार्यशाळा

Next

सिडको : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालय व अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या वतीने उद्योजक व कामगारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
आयमा रिफिएशन सेंटर येथील के. आर. बूब कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या कार्यशाळेत व्यासपीठावर भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाचे सहायक आयुक्त देवेंद्र सोनटक्के व रमेशकुमार, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, सरचिटणीस निखिल पांचाल, माजी अध्यक्ष जे. आर. वाघ उपस्थित होते. यावेळी राजेंद्र अहिरे यांनी सांगितले की, आयमा नेहमीच उद्योजक व कामगारांसाठी विविध योजनांविषयी मार्गदर्शनपर चर्चासत्र व कार्यशाळा घेते. उद्योजक व कामगारांना भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाच्या सेवासुविधांचा लाभ आॅनलाइन सुविधांद्वारे त्वरित मिळावा यासाठी सदर कार्यशाळा घेण्यात येत आहे. याप्रसंगी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातर्फे सहायक आयुक्त देवेंद्र सोनटक्के व रमेशकुमार यांनी मार्गदर्शन केले. आयमाच्या पदाधिकाºयांनी पीएफ कार्यालयाच्या अधिकाºयांना नवीन नियमावलीच्या मार्गदर्शनासाठी आठवड्यातील एक दिवस कार्यशाळा घेण्याची विनंती केली. सरचिटणीस निखिल पांचाल यांनी आभार मानले. कार्यक्रमास कंपनी आस्थापना प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Workshops by the Employees Provident Fund Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.