निमात उद्योजकांसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:55 AM2019-07-09T00:55:44+5:302019-07-09T00:56:48+5:30
जागतिक स्पर्धेत सरस ठरण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी वैचारिक व व्यावसायिक कक्षा रुंदावणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड ट्रेड सेंटरचे वीरेंद्र गुप्ते यांनी केले.
सातपूर : जागतिक स्पर्धेत सरस ठरण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी वैचारिक व व्यावसायिक कक्षा रुंदावणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड ट्रेड सेंटरचे वीरेंद्र गुप्ते यांनी केले.
निमा व वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापार करताना आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. गुप्ते यांनी पुढे सांगितले की, जागतिक व्यापाराची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. त्यासाठी स्थानिक उद्योगांनी जागतिक बाजारपेठेतील बदलांबाबत अद्ययावत असणे अनिवार्य असून, केवळ स्थानिक पातळीवर विचार न करता आपल्या वैचारिक व व्यावसायिक कक्षा रुंदावणे महत्त्वाचे आहे. यावेळी व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक प्रवीण देशमुख, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे सल्लागार ए. ओ. कुरुविल्ला, निमाच्या सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी विविध योजनांची माहिती दिली.
वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे सल्लागार ए. ओ. कुरुविल्ला यांनी येथे अशा प्रकारची कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारच्या सल्लागार वंदना प्रताप, कृती अग्रवाल यांनी सरकारच्या मैत्री पोर्टलच्या माध्यमातून उद्योगांच्या विस्तारासाठी कोणती मदत करू शकते, याविषयी मार्गदर्शन केले.