भारतीय शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:28 AM2018-11-05T00:28:14+5:302018-11-05T00:28:28+5:30
भारतीय शिक्षण मंडळ आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे बिंदू रामराव देशमुख महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड परिसरातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
नाशिक : भारतीय शिक्षण मंडळ आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे बिंदू रामराव देशमुख महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड परिसरातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. लीना पांढरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय शिक्षण मंडळाचे महाराष्टÑ प्रांत अध्यक्ष महेश दाबक यांचेही मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत शिक्षकांची भूमिका, भारतीय संस्कृती, शिक्षराचे भारतीयकरण, शिक्षण समृद्ध होण्यासाठी वाचन, समाजशिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षकांचा मानसिक, बौद्धिक विकास ही काळाची गरज आहे यावर केंद्रीत करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. पांढरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षक हा राष्टÑाचा आधारस्तंभ असल्यामुळे शिक्षकाने शिक्षणाला जास्तीत जास्त महत्त्व देऊन शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशामध्ये नैतिकता, समानता आणि देशांचा नैतिक विकास, समानता शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये रूजविता येतात, असेही त्या म्हणाल्या. यावेळी शिक्षण मंडळाची कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेस प्रा. प्रकाश वारकरी, प्रा. तेजेश बेलदार, प्रा. विनोद निरभवणे, प्रा. भास्कर नरवटे, प्रा. चंद्रकांत गोसावी आदि उपस्थित होते.