जागतिक चिमणी दिवस...
By admin | Published: March 20, 2017 12:20 AM2017-03-20T00:20:03+5:302017-03-20T00:21:43+5:30
‘चोचीने काडी-कचरा वेचूनी चिमणा-चिमणी, सुंदर असे घरटे बांधी घरात... इवलेसे पक्षी ठेवी घरट्यात, भरवी त्यांना चोचीने दाणापाणी चिमणा-चिमणी...’
‘चोचीने काडी-कचरा वेचूनी चिमणा-चिमणी, सुंदर असे घरटे बांधी घरात... इवलेसे पक्षी ठेवी घरट्यात, भरवी त्यांना चोचीने दाणापाणी चिमणा-चिमणी...’ काव्यपंक्तीत कवीने वर्णलीले चित्र वास्तववादी असले तरी काळानुरूप मानवाची बदललेली जीवनशैली आणि घरांच्या बदलेल्या स्वरूपामुळे चिऊताईचे अंगणही बदलले आहे. झाडाच्या फांदीमध्ये असलेल्या खड्ड्यात अशा पद्धतीने निवारा शोधण्याचा प्रयत्न करताना चिमणा-चिमणीचे हिरावाडी परिसरात टिपलेले छायाचित्र. नाशिक शहरात चिमण्यांचे प्रमाण कमी झाले असल्याचे बोलले जात असले तरी गोदाकाठी अनेक ठिकाणी बाभळीच्या विस्तीर्ण झाडांमध्ये चिमण्यांचे कॉरिडॉर बनले आहे. तसेच शहरातून जाणाऱ्या कालव्यालगतही चिमण्यांचे थवे दृष्टीस पडतात.गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण संवर्धनाबाबत झालेल्या जनजागृतीमुळे अनेक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी चिमणी संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. विशेषत: उन्हाळ्यात चिमण्यांसाठी पाण्याचे भांडे आणि बर्ड फिडरची व्यवस्था केली जाते.