विश्वस्तरीय जैन जनगणनेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:04 AM2018-08-03T01:04:48+5:302018-08-03T01:05:04+5:30
नाशिक : देशातील जैन बांधवांची प्रत्यक्षात असलेली संख्या व सन २०११ मध्ये झालेली जनगणनेतील नोंद यात कमालीची तफावत आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर विश्वजैन समाज संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून त्या माध्यमातून विश्वस्तरीय जनगणनेस प्रारंभ करण्यात आला आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात जैन बांधवांची संख्या ४४ लाखांपेक्षाही कमी नोंदविण्यात आलेली आहे. अनेक बांधव या नोंदीपासून वंचित आहेत, त्यामुळे नोंदीतील आकड्यात फरक दिसून येत आहे. २०२१ साली भारतात होणाऱ्या जनगणनेत जैन बांधवांच्या आकडेवारीची वास्तव नोंद व्हावी यासाठी समाजातील ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन विश्वजैन समाज या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आहे.
समाजात जागृती होण्याच्या उद्देशाने राष्टÑीय, आंतरराष्टÑीय, राज्यस्तरीय तसेच स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. जनगणनेच्या नोंदीचे उद्दीष्टपूर्ती व्हावी यासाठी अल्ल१िङ्म्र ि& कङ्म२ अॅप व वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत २ लाख समाजबांधवांची नोंद झाली आहे. जैन बांधवांनी या जनगणनेस हातभार लावावा, असे आवाहन विश्वस्त सतीश बोरा, स्वप्नील जैन, मनोज जैन (बंगलोर), संतोष संकलेचा, चंद्रशेखर चोरडिया व अभय ब्रम्हेचा यांनी केले आहे.जैन बांधवांनी श््र२ँ६ं्नं्रल्ल रेंं्न या अॅपमध्ये आपल्यासह परिवाराची माहिती, छायाचित्रे, जैन तीर्थस्थाने, मंदिरे, स्थानक, धर्मशाळा, शिक्षणसंस्था, गोशाळा, हॉस्पिटल, धर्मार्थ दवाखाने आदि माहिती नोंदवायची आहे.