जागतिक दर्जाचे द्राक्षवाण आरा-३२ भारतात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 01:09 PM2019-11-21T13:09:04+5:302019-11-21T13:12:37+5:30
दिंडोरी : प्रतिकूल परिस्थितीतही सक्षम राहण्यात आणि गोड चवीचे उत्पादन देण्यासाठी कॅलिफोर्नियातील ‘आरा’ वाण जगप्रसिध्द आहेत. यातील काळ्या रंगाचा ‘आरा-३२’ हा वाण भारतात नुकताच दाखल झाला आहे.
दिंडोरी : प्रतिकूल परिस्थितीतही सक्षम राहण्यात आणि गोड चवीचे उत्पादन देण्यासाठी कॅलिफोर्नियातील ‘आरा’ वाण जगप्रसिध्द आहेत. यातील काळ्या रंगाचा ‘आरा-३२’ हा वाण भारतात नुकताच दाखल झाला आहे. ‘आरा-१५’चे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर ‘आरा ३२’ हे पुढचे महत्वाचे पाऊल मानले जात आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या प्रक्षेत्रावर मंगळवारी या वाणाचे सीडलींग्स आणण्यात आले. राज्यातील द्राक्ष उत्पादकांना मागील अनेक वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत ही शेतीच संकटात सापडली आहे. ‘आरा’ सारखे जागतिक दर्जाचे वाण अशा प्रतिकूल हवामानातही खात्रीचे आणि दर्जेदार उत्पादन देतात हे आतापर्यंत दिसून आले आहे. त्या पाशर््वभूमीवर या वाणांची आयात करु न द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. निर्यातक्षम ‘आरा’ या जागतिक वाणाचे सर्वाधिक अधिकार मिळाल्याने केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील द्राक्ष उत्पादकांना विशेषत: छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
द्राक्षाच्या सुप्रसिध्द ‘आरा’ या कॅलिफोर्नियातील द्राक्ष वाणांच्या श्रेणीचे भारतातील उत्पादन आणि विक्र ीचे सर्वाधिकार सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला मिळाले आहेत.
सहा खंडांमधील २४ देशांत ‘आरा’ जातीची द्राक्षे उत्पादित केली जातात. भारताचा समावेश आता या देशांमध्ये झाला आहे. भारतातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यास ‘आरा’ वाणांमुळे फायदा होणार आहे. या पेटंटेड ‘आरा’ टेबल ग्रेप्सच्या (खाण्याची द्राक्षे) व्हाईट, रेड आणि ब्लॅक या तीन प्रकारांत एकाहून एक सरस अशा निर्यातक्षम जाती आहेत.
द्राक्षे उत्पादन आणि विक्र ीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्र मांकाचे राज्य आहे. ‘आरा’ वाणांमुळे आगामी काळात राज्याच्या आणि अर्थातच ‘ग्रेप कॅपिटल’ समजल्या जाणाºया नाशिकच्या द्राक्ष उत्पादन क्षेत्रात क्र ांतिकारी बदल अपेक्षति आहेत.