दुबई येथे विश्वशांती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:44 AM2019-04-09T00:44:44+5:302019-04-09T00:45:02+5:30
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून अजमान, दुबई येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन मोरे यांनी सेवेकऱ्यांशी हितगूज साधले.
नाशिक : श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या देश-विदेश स्वामी सेवा अभियानाच्या व दुबई येथील सेवा केंद्राच्या माध्यमातून अजमान, दुबई येथे श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन मोरे यांनी सेवेकऱ्यांशी हितगूज साधले.
या महोत्सवासाठी दुबई, अबुधाबी, शारजा, अजमान येथील स्थानिक अरबी, ख्रिश्चन, गुजराथी, मारवाडी, सिंधी व हिंदू भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भारतातून देश-विदेश अभियान प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदवली. सर्वप्रथम भूपाळी आरती, त्यानंतर विविध उपक्र मांचे आयोजन केले गेले. बालसंस्कारच्या मुलांनी मान्यवरांचे स्वागत दिंडी काढून केले. नितीन मोरे यांच्या स्वागतासाठी दुबई येथील प्रतिनिधी रवि काळे, अजमान येथील अरबी उद्योजक हसान खलिफा अल फुकाई, उद्योजक एल. जो. फर्नांडिस, चंद्रप्रताप, रचना महाजन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवाातीला श्री स्वामी महाराजांच्या पादुकांसमवेत पवित्र कुराण ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या पादुका पूजनाचा स्थानिक मुस्लीम भाविकांनीदेखील लाभ घेतला.
यावेळी नितीन मोरे यांनी, मानवी जीवनातील विविध पैलूंची सेवामार्गाशी कशी सांगड घातली आहे, हे आपल्या हितगुजातून स्पष्ट केले. प्रत्येक धर्मातील पवित्र ग्रंथ एकत्र राहण्याची व एकमेकांना आधार देण्याचीच शिकवण देतात. स्वामी महाराजांनी विश्वभ्रमंती करून प्रत्येक धर्मातील शिष्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून समाज उद्धाराचे कार्य करून घेतले आहे.
या कार्यात बालसंस्कार विभागाला खूप महत्त्व आहे. गुरूमाउलींनी या सर्व विभागाची प्रशिक्षणे व विविध समाजोपयोगी संशोधने करण्याठीच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ गुरु पीठाची स्थापना केली आहे. सेवामार्गाच्या विविध विभागांचे मार्गदर्शन स्लाईड शो च्या माध्यमातून करण्यात आले.