शहरात ‘वर्ल्ड जावा डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:33 AM2019-07-15T01:33:07+5:302019-07-15T01:33:21+5:30
शहर व परिसरातील जावा बाइकप्रेमींनी एकत्र येऊन ‘वर्ल्ड जावा डे’ साजरा केला. सिटी सेंटर मॉलच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ९० येझदी जावा दुचाकींचे जुने-नवे मॉडेल नाशिककरांना बघता आले.
नाशिक : शहर व परिसरातील जावा बाइकप्रेमींनी एकत्र येऊन ‘वर्ल्ड जावा डे’ साजरा केला. सिटी सेंटर मॉलच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ९० येझदी जावा दुचाकींचे जुने-नवे मॉडेल नाशिककरांना बघता आले.
२०१२ साली स्थापन झालेल्या नाशिक ‘येझदी जावा क्लब’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यावर्षीही १७व्या जावा डेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येझदीच्या जावा बाइक वापरणाऱ्या क्लबच्या सभासदांनी आपल्या बाइक या क ार्यक्रमात आणल्या. सध्याच्या पिढीसाठी जुन्या झालेल्या मात्र तेवढ्याच ‘युनिक’ आणि विंटेज ठरणाºया येझदी बाइकवर बसून सेल्फी घेण्याचा मोह यावेळी तरुणाईला आवरता आला नाही. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील उपस्थित होते.
शहरात २०१३ सालापासून हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती क्लबचे अंबरिश मोरे यांनी दिली. पहिल्या वर्षी सर्व जावाप्रेमींनी त्यांच्या येझदी बाइकवरून फेरी काढत ‘मुलगी वाचवा’ असा संदेश दिला होता. यावर्षी केवळ बाइक डिस्प्ले करण्यात आल्या होत्या. दरवर्षी जुलै महिन्याच्या दुसºया रविवारी ‘वर्ल्ड जावा डे’ जगभरात साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले.