त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 08:19 PM2020-10-13T20:19:37+5:302020-10-14T01:05:13+5:30
त्र्यंबकेश्वर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आण िमराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शनिवारी(दि.१०) मानसिक आरोग्य जपताना या विषयावर जिल्हास्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
त्र्यंबकेश्वर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आण िमराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शनिवारी(दि.१०) मानसिक आरोग्य जपताना या विषयावर जिल्हास्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. ए. के. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या वेबिनारच्या प्रारंभी मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एम. माळी यांचा, संयोजक डॉ. एस. एस. कांबळे यांनी यथोचित सत्कार केला. प्रा. एम. आर.थोरात यांनी वेबिनारचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपप्राचार्य एस. एस. देवरे, प्रा. एम. एन. खालकर, डॉ. एस. जे. निकम, डॉ. एम. डी. दुगजे, प्रा. ए. एस. खाडे, जगताप आदी उपस्थित होते.
मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.एम. माळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले की, दरवर्षी जरी जागतिक मानिसक आरोग्य दिन वेगवेगळ्या कारणांनी साजरा होत असला तरी 2020 वर्षात संपन्न होणारा हा दिवस ष्श1द्बस्र-19 या महामारीला अनुसरून खूपच महत्वाचा ठरला आहे. सर्वांसाठी मानिसक आरोग्य उत्तम खबरदारी -उत्तम आरोग्य,या थीमला अनुसरून घेतल्याने, मानसशास्त्रातील क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी या वर्षभरात अतिशय मोलाची भूमिका बजावली. सर्वांचेच मानिसक आरोग्य या कालावधीत जपणे अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.यापूर्वी अठराव्या शतकात मानिसक रु ग्ण, त्यांच्या पापाची शिक्षा म्हणून आजारी होतात असा समज होता. त्यामुळे रु ग्णांना बांधून ठेवले जात होते, छळ केला जात असे. नंतरच्या कालखंडात फिलिप फिनेल या शास्त्रज्ञाने ही क्रूर पद्धत बंद केली. शरीरशास्त्राच्या अभ्यासात प्रगती झाली. जैवमनोसामाजिक कारणांमुळे विकृती निर्माण होऊ शकते, असा विचार पुढे आला.आज भारतात प्रत्येक पाच व्यक्तींच्या मागे एक मनोरु ग्ण आहे. जवळपास 26 कोटी लोक मानिसक आजाराचा सामना करतात असे सरकारी आकडेवारीनुसार दिसून येते. सिग्मंड फ्राईड यांच्या मते , मन हे हिमनगासारखे असते.मनाचा थोडासाच भाग आपल्याला माहीत असतो बाकी अबोध मनाच्या पातळीवर असतो व त्यानुसार मानिसक समस्या निर्माण होतात. इदम्, अहम आण िपराअहम यामध्ये समतोल साधता आला तरच आरोग्य सुदृढ राहते. अन्यथा इदमचे प्राबल्य वाढल्यास मानिसक संघर्ष निर्माण होतात.
जीवन जगत असताना कुटुंब, नातेवाईक, मित्र,यांच्यासोबत घिनष्ठ नाते सांभाळून त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वत:चा व इतरांचा आदर केला पाहिजे, त्यातून आत्मसन्मान वाढवून मानिसक आरोग्य चांगले राहते. मानिसक आजाराची लक्षणे, ढोबळमानाने अचानक रडू येणे, रिकामेपणा वाटणे, झोप न लागणे, आत्महत्येचा सतत विचार येणे, निराशावादी असणे अशी दिसतात . सुदृढ मानिसक आरोग्य प्रस्थापित करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. त्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे, योग्य प्रमाणात आहार व झोप घेणे, इतरांविषयी पूर्वग्रह न करणे,शारीरिक दृष्ट्या तंदुरु स्त असणे, इतरांना मदत करणे यासारखी जीवनशैली अवलंबल्यास आपल्याला स्वत:चे व इतरांचे मानिसक आरोग्य निश्चित जगता येईल असे प्रतिपादन डॉ.माळी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाभरातून जवळपास 75 प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा मिलिंद थोरात यांनी केले तर डॉ शरद कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.