त्र्यंबकेश्वरला मे महिन्यात विश्वशांती धर्म संस्कृती सोहळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 06:33 PM2021-02-14T18:33:31+5:302021-02-14T18:34:05+5:30

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे येथील श्रीराम शक्ती पीठ संस्थान पिठाधिश्वर अनंत विभुषित श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती ...

World Peace Dharma Culture Festival in Trimbakeshwar in May! | त्र्यंबकेश्वरला मे महिन्यात विश्वशांती धर्म संस्कृती सोहळा !

त्र्यंबकेश्वरला मे महिन्यात विश्वशांती धर्म संस्कृती सोहळा !

googlenewsNext
ठळक मुद्देस्वामी सोमेश्वरानंद सरस्वती श्रमात झाला प्रसिद्धीपत्रकाचा प्रकाशन सोहळा

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे येथील श्रीराम शक्ती पीठ संस्थान पिठाधिश्वर अनंत विभुषित श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज निरंजनी अखाडा यांच्या वतीने येत्या ७ ते १४ मे २०२१ या कालावधीत विश्वशांती नवनिर्मित भारतीय संस्कृती धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
              या कार्यक्रम आयोजनाच्या प्रसिद्धी पत्रकाचा प्रकाशन सोहळ्याचे श्रीराम शक्ती पीठ श्रीक्षेत्र बेझे येथील आश्रमात प्रकाशन करतांना श्रीराम शक्तीपीठ संस्थान पीठाधीश्वर अनंत विभुषीत श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वती, महाराज पंचायती अखाडा श्री निरंजनी यांच्या हस्ते व सिध्देश्वरानंद सरस्वती महाराज, श्रीनाथानंद सरस्वती महाराज, सुदर्शनानंद सरस्वती महाराज, राहुल महाराज साळुंके, रविंद्र महाराज नन्नवरे, ॲड. अशोक आहीरे, हिरामण ढगे, दिपक गवळी, सुरेश चव्हाण, राजाराम चव्हाण, अशोक बदादे, डॉ.अजय कापडणीस वआदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

                     मे महिन्यात साकार होणा-या याविश्वशांती धर्म सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार असुन पहाटे दररोज ५ ते ७ काकड भजनारती सकाळी ८ ते १० श्रीगुरु अमृतधारा या ग्रंथाचे पारायण. सकाळी १० ते दुपारी १२ दररोज एक अशा विविध नामवंत वक्त्यांची व्याख्याने, आरोग्य शिबीर, समाजोपयोगी उपक्रम दुपारी १२ ते २ विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, दुपारी ३ ते ५ श्रीराम कथा सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ७ ते ९ हरिकीर्तन तसेच रोज दु.२ ते ३ व सायंकाळी ६ ते ७ या वेळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

               याशिवाय प्राणायाम शिबीर, रोजगार - व्यवसाय - नोकरी मार्गदर्शन, गंगा ग्रामस्वच्छता मार्गदर्शन तसेच रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, विद्यार्थी व युवा मार्गदर्शन याबरोबरच सेवा श्रध्दा संस्कार कृषी पर्यावरण यावर मार्गदर्शन करण्यात येईल.
सात दिवसीय कार्यक्रमास अनेक आश्रमातील, मठातील साधु, महंत, पिठाधिश्वर, महामंडलेश्वर आदी सिध्दपिठातील नामवंत विद्वान किर्तनकार, प्रवचनकार, अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी पुरुष आदी मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या प्रसिद्धीकरणाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (दि.१३) पार पडला. 

Web Title: World Peace Dharma Culture Festival in Trimbakeshwar in May!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.