खोडरबराच्या संग्रहातून सृष्टीने केला जागतिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:47 PM2018-04-19T12:47:32+5:302018-04-19T12:47:32+5:30

सृष्टीच्या संग्रहात साडेतीन हजारपेक्षा अधिक खोडरबर आहेत.

World Record by Khodarab Collection | खोडरबराच्या संग्रहातून सृष्टीने केला जागतिक विक्रम

खोडरबराच्या संग्रहातून सृष्टीने केला जागतिक विक्रम

Next
ठळक मुद्देसृष्टीच्या संग्रहात साडेतीन हजारपेक्षा अधिक खोडरबर आहेत.

नाशिक : नाशिकच्या रचना विद्यालयात शिकणाऱ्या सृष्टी नरेंद्र नेरकर या विद्यार्थिनीने खोडरबर (इरेजर) जमा करण्याच्या छंदातून जागतिक विक्रम केला आहे. तिला खोडरबर जमा करण्याची सुरु वातीपासून आवड होती. या आवडीचे छंदात रूपांतर केव्हा झाले हे तिलाच कळले नाही.
सृष्टीच्या या संग्रहाची दखल जागतिक पातळीवरील वंडर बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि जीनियस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर््स लंडन या संस्थांनी घेतली आहे. सोमवारी (दि. १६) रचना प्रविद्यालयाच्या एस. एम. जोशी सभागृहात सृष्टीला या संस्थेतर्फे मानपत्र समन्वयक अमी छेडा यांच्याकडून प्रदान करण्यात आले. स्मृतिचिन्ह सुधाकर साळी व मेडल विजय डोंगरे यांनी दिले. याप्रसंगी मुख्याध्यापक संगीता टाकळकर, शांताराम अहिरे, यशवंत ठोके,अनंत धामणे आदींसह शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. सृष्टी बालवाडीत जात असताना स्टेशनरीच्या दुकानात आवडीने खोडरबर बघायची. त्यांचे विविध आकार, रंग तिला आवडायचे. तिचा हाच छंद आज जागतिक स्तरावर पोहोचला आहे. सृष्टीच्या संग्रहात साडेतीन हजारपेक्षा अधिक खोडरबर आहेत.

Web Title: World Record by Khodarab Collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.