खेळाडूंचे विश्व भीष्मराज बाम :  अंजली भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:15 AM2018-05-13T00:15:42+5:302018-05-13T00:15:42+5:30

खेळाडूंना मानसिक आधारासोबत सकारात्मक दृष्टिकोनाची शिकवण राज्याचे दिवंगत माजी पोलीस महासंचालक व क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ गुरूतुल्य भीष्मराज बाम यांनी दिली. बाम हे खेळाडूंचे एक विश्वच होते, असे मत अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्टÑीय नेमबाजपटू अंजली भागवत यांनी व्यक्त केले.

World of Sports: Bhishma Raj Bal: Anjali Bhagwat | खेळाडूंचे विश्व भीष्मराज बाम :  अंजली भागवत

खेळाडूंचे विश्व भीष्मराज बाम :  अंजली भागवत

Next

नाशिक : खेळाडूंना मानसिक आधारासोबत सकारात्मक दृष्टिकोनाची शिकवण राज्याचे दिवंगत माजी पोलीस महासंचालक व क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ गुरूतुल्य भीष्मराज बाम यांनी दिली. बाम हे खेळाडूंचे एक विश्वच होते, असे मत अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्टय नेमबाजपटू अंजली भागवत यांनी व्यक्त केले. निमित्त होते, भीष्मराज बाम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शंकराचार्य सभागृहात बाम परिवाराच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे. शनिवारी (दि.१२) संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अंजली भागवत या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी, संजीव लाटकर, अशोक कोठावळे, अभिजित बाम उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी बाम यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, बाम हे नेहमी आम्हा महिला नेमबाजपटूंना ‘चिमण्या’ म्हणून लाडाने बोलवत असे. त्यांनी माझ्यामध्ये अंतर्मनाविरुद्ध कृती करण्याचे धाडस निर्माण केले. आंतरराष्टÑीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल आणि त्या संधीचे सोने क रता येईल, हे स्वप्नातही वाटले नव्हते; मात्र त्यांचे मार्गदर्शन आणि ‘टिप्स’मुळे हे शक्य झाले. त्यांच्यासोबतचा सहवास माझ्यासाठी सुवर्ण पदकापेक्षा कमी नाही. एकाग्रता, आत्मविश्वास कसा टिकवून ठेवायचा हे बाम यांच्याकडून शिकायला मिळाले. बाम यांचा आवाज आमचा विश्वास होता. गुरू म्हणजे विश्वास असतो आणि त्यांच्या ‘टिप्स’वर विश्वास दाखविला की मग जगही जिंकता येते, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते बाम यांच्या मना सज्जना व मनोपासना या दोन पुस्तकांसह स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. धर्माधिकारी यांनीही मनोगतातून बाम यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. प्रास्ताविक डॉ. भरत केळकर यांनी केले व सूत्रसंचालन वंदना अत्रे यांनी केले.
‘बाम यांचे स्वप्न पूर्ण करूया’
भीष्मराज बाम यांनी बघितलेले स्वप्न आपण सारे मिळून पूर्ण करूया, त्यासाठी त्यांचे आशीर्वाद आपल्याला आहेच. बाम यांनी भेट दिलेली साडी मी अजून जपून ठेवली असून, ती माझ्यासाठी अनमोल ठेवा असल्याचे अंजली भागवत यांनी यावेळी सांगितले. आॅलिम्पिकसाठी भारताचे प्रतिनिधित्व करताना बाम यांनी आमच्या सुरक्षिततेसाठी घरात यज्ञ केला होता, ते आजही माझ्या स्मरणात आहे.

 

Web Title: World of Sports: Bhishma Raj Bal: Anjali Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा