वनव्यवस्थापन समितीच्या वतीने बागलाणला जागतिक व्याघ्र दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 03:36 PM2020-07-30T15:36:43+5:302020-07-30T15:38:04+5:30
कंधाणे : बागलाण तालुक्यातीलयेथे वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात आला.
लोकमत न्युजनेटवर्क
कंधाणे : बागलाण तालुक्यातीलयेथे वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात आला.
पर्यावरण संतुलनात वाघांचे अनन्य साधारण महत्व असुन अन्न साखळीतील वरच्यास्थानी वाघ येत असल्याने पर्यावरण संतुलनासाठी वाघांचे अस्तित्व गरजेचे असल्याचे प्रतिपादन मानद वन्यजीव सरंक्षक अमीत खरे यांनी केले. तिळवण ता. बागलाण येथे वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्र माच्या खरे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या वन्यजीव समितीचे समन्वयक विकास देशमुख हे होते. उपस्थितांना निसर्ग मित्र व सामाजिक कार्यकर्ते दिलीप आहिरे यांच्या हस्ते आयुर्वेदिक वृक्षांचे रोपटे देवुन सन्मानीत करण्यात आले. यावेळी सटाणा वन परिक्षेत्र अधिकारी रमेश साठे, पर्यावरणवादी प्रा. शांताराम गुंजाळ, दिलिप अहिरे, राकेश घोडे, वनपाल जे. के. शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र मास सरपंच चिंधा पवार, उपसरपंच तुकाराम बच्छाव, अशोक गुंजाळ, तुळशीराम गुंजाळ, मधुकर जाधव, दिनेश गुंजाळ, वनपाल वैभव हिरे, अशोक शिंदे, वनरक्षक नवनाथ मोरे, प्रफुल पाटील, किशोर मोहिते, हरि अहिरे, दत्तात्रेय देवकाते, गौतम पवार, स्वाती सावंत, चारू तडीस, काशिनाथ हांडे आदी उपस्थित होते. (फोटो ३० कंधाणे)