नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन पारंपरिक पद्धतीने साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 04:09 PM2017-08-09T16:09:55+5:302017-08-09T16:13:37+5:30
जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या कुरुंगवाडी गावात आदिवासी महिलांनी पारंपरिक लोककला सादर केल्या.
घोटी (नाशिक), दि. - जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या कुरुंगवाडी गावात आदिवासी महिलांनी पारंपरिक लोककला सादर केल्या. महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक लोककला अतिशय आकर्षक होत्या. इगतपुरी तालुक्यातील उपेक्षित आणि दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या कुरुंगवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला.
प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तेलोरे यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आलेल्या या आदिवासी दिन कार्यक्रमाच्या आरंभी शालेय विद्यार्थ्यांची गावातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी महिला व पुरुषांनी पारंपरिक आदिवासी लोकनृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पेठमध्येही आदिवासी दिन उत्साहात साजरा
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातही जागतिक आदिवासी गौरव दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विविधरंगी आदिवासी कलापथकांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. सर्व आदिवासी बांधवांनी डोक्यावर ''जय आदिवासी, आदिवासी गौरव दिनाचा विजय असो'' अशा आशयाच्या टोप्या परिधान केल्या होत्या.
कल्याणमध्येही आदिवासी दिन साजरा करण्यात आला.