जागतिक आदिवासी दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 08:04 PM2021-08-10T20:04:49+5:302021-08-10T20:09:30+5:30
घोटी : ईगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात घोटी येथून मिरवणूक काढली. आदिवासी बांधवांनी आगळ्या वेगळ्या पारंपारिक नृत्याद्वारे संस्कृतीचे दर्शन घडविले .
घोटी : ईगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात घोटी येथून मिरवणूक काढली. आदिवासी बांधवांनी आगळ्या वेगळ्या पारंपारिक नृत्याद्वारे संस्कृतीचे दर्शन घडविले .
आदिवासी ठाकुर समाजातील पुरूषांनी केलेले 'कांबडनाच' हे नृत्य आकर्षणाचे केंद्र ठरले. शाळकरी मुलींनी आदिवासी पोशाख घालुन केलेली नृत्य व स्वागत गितांनी लक्ष वेधून घेतले. प्रा. नितिन तळपडे यांनी व्याख्यानातुन समाज प्रबोधन केले. समारंभात आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड यांनी मनोगत व्यक्त केले.
दिप प्रज्वलन करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला पुष्पहार करण्यात आले. व्यासपीठावर आ. माणिक कोकाटे ,माजी आमदार शिवराम झोले, आयोजक गोपाळ लहांगे, समाज कल्याण सभापती सुशिला मेंगाळ, प्रा. मनोहर घोडे, सरपंच सचिन गोणके, अनिता घारे आदी मान्यवर उपस्थित होते.