जगाच्या कल्याणा संतांची विभूती : धोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:18 AM2018-05-12T00:18:30+5:302018-05-12T00:18:30+5:30
संत हे चंदनासारखे असतात. चंदन हे स्वत: झिजते व दुसऱ्यांना सुगंध देते, तसे संत स्वत: झिजतात आणि जगाचे कल्याण करतात. जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिराचे अध्यक्ष कीर्तनकेसरी संजय धोंडगे यांनी केले.
सिडको : संत हे चंदनासारखे असतात. चंदन हे स्वत: झिजते व दुसऱ्यांना सुगंध देते, तसे संत स्वत: झिजतात आणि जगाचे कल्याण करतात. जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिराचे अध्यक्ष कीर्तनकेसरी संजय धोंडगे यांनी केले. राजे संभाजी स्टेडियम नाशिक येथे विश्वशांती वैष्णव धर्म सोहळ्यांतर्गत राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन करताना धोंगडे बोलत होते. कार्यक्र मास रामायणाचार्य रामराव ढोक, शिवाजी चुंभळे, मुरलीधर पाटील, कावेरी घुगे, नगरेसवक कल्पना चुंभळे, डॉ. धनश्री दास, रत्नाकर चुंबळे, आदी उपस्थित होते. कीर्तनकेसरी धोंडगे महाराज पुढे म्हणाले, चंदन तापनाशक आहे, तर संत त्रिविदा ताप घालवितात. संत हे दुर्जनालाही सज्जन बनवितात. संतांचा महिमा सांगण्यासाठी चंदन, परीस, साखर, दिव्याचा दृष्टांत सांगितला जात आहे. चंदनाचे हात पायही चंदन ! परिसा नाही हीन कोणी अंग !! दीपा नाही पाटी पोटी अंधकार ! सर्वांगी साखर अवघी गोड !! तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुन मिळेविना !! सेवेसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तीन चरणांचा अभंगही यावेळी कीर्तनकार घोंगडे महाराज यांनी सांगितला. यावेळी दररोज सुरू असलेल्या पतंजली प्राणायाम व योग शिबिर योगाचार्य गोकुळ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक तथा स्थायी समितीच्या सदस्य पुष्पा आव्हाड, साहेबराव आव्हाड, लोकनेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कीर्तन महोत्सवाचे कार्याध्यक्ष गोविंद घुगे व स्मिता शिंदे, रामनाथ गंभीरे, योगीनाथ पवार, मधुकर आवारे, सुभाष वाणी, शरद पेढेकर, बाळासाहेब शेळके आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.