येवला शहरात प्रतिमा पूजन,व भव्य मिरवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 04:36 PM2019-12-25T16:36:07+5:302019-12-25T16:37:08+5:30
येवला : येवला शहर व तालुक्यात संत शिरोमणी तेली समाजाचे वैभव श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला शहरात प्रतिमा पूजन,व भव्य मिरवणुक,महाप्रसादाचा कार्यक्र म संपन्न झाला.
प्रतिमेचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले.बुधवार १८ डिसेंबर ते सोमवार २४डिसेंबरदरम्यान येवला समस्त तेली समाजाच्या वतीने पुण्यतिथी सोहळ्याची सुरु वात श्री तुकाराम गाथा पारायण व प्रवचनाने झाली.सप्ताहात झालेल्या प्रवचनातून सामाजिक सलोखा,एकतेची भावना,सुखी जीवनाचा मूलमंत्र,जिवंत माणसाची सेवा हीच खरी परमेश्वराची सेवा,विविध संतांनी अंधश्रद्धा विरोधात रचलेले परखड अभंग या बाबत सप्ताहात दररोज प्रबोधन केले. तुकाराम गाथा पारायण झाले. यात कचरू गाडेकर, अर्जुन क्षीरसागर, शंकर क्षीरसागर, नाना महाराज घोंगते,सुमनबाई लुटे, शांताबाई काळे, लताबाई शिरसाठ आदि सहभागी झाले होते. सप्ताहात दररोज दुपारी गीता पाठ वाचन करण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत अश्वरथावर विठ्ठल व संताजी महाराजाची आकर्षक प्रतिमा होती. समाजभूषण अरु ण गांगुर्डे यांचा४ अश्व असलेला चांदीच्या रथात संताजी महाराज व संत तुकाराम यांच्या वेशभूषेत सदानंद बागुल आ िणसंताजी महाराजांच्या वेशभूषेत संतोष मोरे या
युवकांनी केल्या होत्या. संगीताच्या ठेक्यावर थीरकणारा विद्युत रोषणाई केलेला अरु ण गांगुर्डे यांचा घोडा शहरातील चौका चौकात नाचिवला गेला. संताजी महिला ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकी दरम्यान लाठीकाठी चे प्रात्यिक्षक दाखवले.शहरात गंगादरवाजा भागात संताजी मंडळ,संताजी नागरी पतसंस्था ,येवला मर्चंट बँक,थिएटर भागात आनंदशिंदे, किसनराव दिवटे,यांनी विशेष फलक लाऊन संताजी महाराजाच्या प्रतिमा ठेवल्या होत्या .कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी संताजी सेनेच्या कार्यकर्त्यांसह येवला शहर व तालुका तेली समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.काल्याचे कीर्तन हभप शरद महाराज ढोमसे यांनी केले.अतिथींचा सत्कार नारायण रायजादे व नारायण घाटकर यांनी केला.आभार सुर्यकांत महाले यांनी मानले.