सावानात शाहू महाराज, बालगंधर्व यांच्या प्रतिमांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:11 AM2021-06-27T04:11:06+5:302021-06-27T04:11:06+5:30
नाशिक : छत्रपती शाहू महाराज यांनी ब्रिटिश काळात कोल्हापूर येथे २० व्या वर्षी राज्य कारभार सुरु केला. त्यांनी प्राथमिक ...
नाशिक : छत्रपती शाहू महाराज यांनी ब्रिटिश काळात कोल्हापूर येथे २० व्या वर्षी राज्य कारभार सुरु केला. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करीत सामान्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरित केल्याचे प्रा. अशोक सोनवणे यांनी सांगितले. सार्वजनिक वाचनालयात यावेळी छत्रपती शाहू महाराज आणि बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले.
मुलीचे वय लग्नासाठी १४ तर मुलाचे वय १८, तसेच जातीभेद नष्टतेसाठी प्रयत्न केले.भटक्या लोकांसाठी नोकऱ्या दिल्या. त्यांच्या प्रशासनात ५० टक्के राखीव जागा होत्या, हा क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतला. सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे ते राजे होते. महिलांना शिक्षण देण्याच्या कार्यासह कलावंतांच्या पाठीशी उभे राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पदवी मिळाली, तेव्हा स्वतः शाहू महाराजांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. बहुजन समाज एकसंधपणे उभा करण्यासाठी शाहू महाराजांचे फार मोठे योगदान असल्याचेही विचार प्रा. अशोक सोनवणे यांनी सावानात छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले. दरम्यान, नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व जयंतीनिमित्त प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी शब्दसुमने अर्पण केली. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ॲड. भानुदास शौचे यांनी केले. वसंत खैरनार यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर, वस्तुसंग्रहालय सचिव बी.जी.वाघ, सुभाष सबनीस, दिनेश जातेगावकर, कमलेश ओस्तवाल, मंगेश मालपाठक आदी उपस्थित होते.