‘नरसिंह चतुर्दशी’निमित्त इस्कॉन मंदिरात पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:26 AM2019-05-20T01:26:34+5:302019-05-20T01:26:54+5:30
नरसिंह चतुर्दशी म्हणजेच श्री नरसिंहदेव प्रकट दिनानिमित्त श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात (इस्कॉन) पूजन सोहळा, मंगल आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
नाशिक : नरसिंह चतुर्दशी म्हणजेच श्री नरसिंहदेव प्रकट दिनानिमित्त श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात (इस्कॉन) पूजन सोहळा, मंगल आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
इस्कॉन मंदिरात गेल्या पंधरा दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी (दि. १८) पहाटे ५ वाजता मंगल आरतीने कार्यक्रमांना प्रारंभ झाला. त्यानंतर महामंत्र जप, शृंगार दर्शन आणि भागवत कथा आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी श्री नरसिंह यज्ञ संपन्न झाला. यानिमित्त श्रीश्री राधा मदन गोपालजी यांच्या मूर्तीची विशेष सजावट करण्यात आली होती. मंदिरातील सजावटीसाठी दक्षिण भारतीय पद्धतीने केळी आणि नारळाच्या पानांचा वापर करण्यात आला होता. सायंकाळी नरसिंहदेवांचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वृंदावन येथील अच्युतलाल भट महाराज यांची भागवत कथा संपन्न झाली.