भातोडे येथे निसर्गाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:44 PM2017-10-15T23:44:45+5:302017-10-16T00:26:27+5:30
वणी : भातोडे येथे वसूबारस अर्थात वाघबारस साजरी करण्यात आली. भातोडे गावात महाले परिवाराकडून वसूबारसाची पूजा केली जाते. वसूबारसच्या पूर्वसंध्येला यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने वाघदेव, नागदेव, सूर्यदेव, चंद्रदेव, धरतीमाता, जंगलाची, निसर्गाची पूजा आदिवासी भगत बाजीराव महाले यांच्या हस्ते करण्यात आली.
वणी : भातोडे येथे वसूबारस अर्थात वाघबारस साजरी करण्यात आली. भातोडे गावात महाले परिवाराकडून वसूबारसाची पूजा केली जाते. वसूबारसच्या पूर्वसंध्येला यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने वाघदेव, नागदेव, सूर्यदेव, चंद्रदेव, धरतीमाता, जंगलाची, निसर्गाची पूजा आदिवासी भगत बाजीराव महाले यांच्या हस्ते करण्यात आली. शेंदूर, तांदूळ, नागली पाचखाद्य पदार्थांचे नैवेद्य तयार करून पूजन केले. दूध व पाण्याने देवाला अंघोळ घालण्यात आली. संध्याकाळी गाय, वासरू, बैल, म्हैस पाळीव प्राण्यांची पूजा केली जाते. गावातून गुराखी गाणे गातात. मिरवणूक काढली जाते. आली वर्षाची दिवाळी हो, आली वर्षाची दिवाळी, गायी म्हशी ओवाळी हो, बहीण भावाला ओवाळी आली वर्षाची धिंडवाळी. मनोभावे पूजा करतात. धनधान्ये पिकू दे, सर्वांना सुखी ठेव. गुराढोरांना सुखी ठेव अशी प्रार्थना केली जाते.