लक्ष्मीपूजनाला शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन 

By Suyog.joshi | Published: November 12, 2023 03:22 PM2023-11-12T15:22:41+5:302023-11-12T15:23:34+5:30

नाशिकमध्ये ६१ दिवसापासून मराठा समाजाचे साखळी उपोषण

worship of shivaji maharaj statue at shiva tirtha on lakshmi puja in nashik | लक्ष्मीपूजनाला शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन 

लक्ष्मीपूजनाला शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन 

नाशिक (सुयोग जोशी) : येथील शिवतीर्थावर गेल्या ६१ दिवसापासून मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. लक्ष्मीपूजनाला (दि. १२ रोजी) शिवतीर्थावर शिवपुतळ्याचे पूजन  करण्यात आले. यावेळी १० गुलाबाची रोपे लावण्यात आली. दिवाळीतील सण सोडून आरक्षण मिळेपर्यंत दिवाळीचा सण करायचा नाही हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ऐन लक्ष्मीपूजनाला दिवसभर मराठा समाजातील अनेकजण साखळी उपोषणात सहभागी झाले.

नाशिकच्या शिवतीर्थावर ६१ दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराने साखळी उपोषण अखंडित सुरू ठेवले आहे. लक्ष्मीपूजनाला छत्रपती शिवरायांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा.अशोक दुधारे यांच्या माध्यमातून दहा गुलाबाची रोपे लावण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाची भूमिका प्रवक्ते राम खुर्दळ यांनी मांडली. त्यांनी सकल मराठा समाजाने शिवतीर्थावर राबवलेले उपक्रम व जनजागृतीबाबत मांडणी केली, तर कार्याध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनी सांगितले की, मराठा समाजाने सामाजिक विकासासाठी पुढं यावं,आपल्या समाजाला अधिक आधार द्यावा त्यासाठी आम्ही जागृती करू.

यावेळी प्रचारक नितीन डांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी हजारो पुरावे मिळत असतांना ओबीसी नेत्यांच्या पोटात गोळे येत आहे असल्याचे सांगितले. यावेळी माजी पोलीस अधिकारी के.डी.पाटील,माजी पोलीस अधिकारी चंद्रकांत बनकर,शिवव्याख्याते नितीन डांगे पाटील, सुधाकर चांदवडे,अविनाश वाळुंजे,प्रा.अशोक दुधारे,हिरामण वाघ,अण्णा पिंपळे,अरुण पळसकर, ॲड. कैलास खांडबहाले, मंगला शिंदे,रोहिनी दळवी,पुजाताई धुमाळ,स्वाती कदम,शरद लभडे,विपुल,बनकर, संजय पांगारे,सचिन पवार,सतीश नालकर,दत्तप्रसाद भोसले,विकी गायधनी,सागर वाबळे,जगदीश भोसले,गणेश पाटील,सोपान कडलंग,रविंद्र बोचरे,नितीन खैरनार,दत्तू वामन,निलेश ठुबे,बाबासाहेब मांडवडे,डॉ वैभव गोडसे,नितीन काळे,प्रकाश आहेर,संतोष पिसाळ,शंकरराव अडसरे,रामराव गायकवाड,सुनील चांदवडे,आत्माराम रेवगडे,गणेश पाटील उपस्थित होते.

Web Title: worship of shivaji maharaj statue at shiva tirtha on lakshmi puja in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.