मानकऱ्यांच्या हस्ते रामरथाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:14 AM2021-04-24T01:14:23+5:302021-04-24T01:14:56+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी राम व गरुड रथोत्सव रद्द करण्यात येऊन शुक्रवारी सायंकाळी रथोत्सव समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करीत रामरथाचे पूजन करण्यात आले.
पंचवटी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी राम व गरुड रथोत्सव रद्द करण्यात येऊन शुक्रवारी सायंकाळी रथोत्सव समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करीत रामरथाचे पूजन करण्यात आले. रामनवमीनंतर दोन दिवसाने कामदा एकादशीला दरवर्षी नाशिक शहरातून श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्याची परंपरा आहे. शुक्रवारी सायंकाळी रास्ते आखाडा तालीम संघ रथोत्सव समितीतर्फे उपस्थितांनी रामरथाचे विधिवत पूजन करीत श्रीफळ वाहण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष राकेश शेळके, ध्वजाचे मानकरी नितीन शेलार, रावसाहेब कोशीरे, दत्तात्रय लाटे, अरुण शेळके, अविनाश दीक्षित, अमित भोईर, प्रतीक गवळी, महेंद्र गवळी, मयूर ईघे, राज जोशी उपस्थित होते.