दिवाळीत रानदेवतांचे पूजन
By admin | Published: October 31, 2016 01:03 AM2016-10-31T01:03:37+5:302016-10-31T01:11:45+5:30
दिवाळीत रानदेवतांचे पूजन
पेठ : धान्याचे पूजन करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन पेठ : आपल्या गावात किंवा घरात नव्याने येऊ घातलेल्या प्रत्येक बाबींचे स्वागत करण्याच्या नानाविध प्रथा व प्रकार प्रचिलत असतात. आदिवासी भागात मात्र रानदेवांच्या प्रार्थनेबरोबर येऊ घातलेल्या नवीन धान्याचे
पूजन करून त्याचे स्वागत करण्याची एक वेगळी परंपरा रूढ झाली असून, याद्वारे आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याची परंपरा आजही जोपासली जात आहे.
पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर यासह गुजरातच्या सीमेलगत असलेल्या भागात प्रामुख्याने भात व नागलीचे पिके घेतली जातात. खरीप हंगामातील पिके दिवाळीला कापणीला येतात. यावेळी आदिवासी बांधव कापणीपूर्वी रानावनातील सर्व प्रकारच्या रानदेवतांचे पूजन करतात. दिवाळीत तीन दिवस हा उत्सव साजरा केला जातो. गावातील सार्वजनिक ठिकाणी धान्याची पूजा मांडून आदिवासी पावरी नृत्य करतात. रात्री गावातील अबालवृद्ध या कार्यक्रमात ताल धरून नृत्य करतात. तिसऱ्या दिवशी गावाच्या शिवावर भात, नागली, उडीद, खुरसणी, वरई या पंचधान्यांचे पूजन करून स्वागत केले जाते. (वार्ताहर)