सिडको परिसरात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:19 AM2018-11-29T00:19:33+5:302018-11-29T00:20:33+5:30
: परिसरात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त समिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्र म आयोजित करण्यात आला.
सिडको : परिसरात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त समिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्र म आयोजित करण्यात आला. यावेळी महात्मा फुले यांच्या वेशभूषेत आदित्य पाटील व सावित्रीबाई यांच्या वेशभूषेत नमिता खैरनार होती. मुख्याध्यापिका राजश्री खोडके यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी स्मिता बोरसे व महेंद्र गवळी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नंदिता घुले हिने केले. तेजल शिंदे हिने आभार मानले.
माध्यमिक विद्यालय, उंटवाडी
माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका रत्नप्रभा सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्र म झाला. कार्यक्र माचे नियोजन वर्गशिक्षिका अश्विनी वाघ यांनी केले. उपमुख्याध्यापिका प्रियंका निकम व प्रवीण जाधव यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थी जान्हवी चव्हाण, श्रेया महाले, नुकूल बाळनाथ, समर्थ बिराढे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन श्रेया शिंदे हिने केले तर आभार पूजा दिवे हिने मानले.
दुपार सत्रात अमोल भडके यांनी मार्गदर्शन केले. सुनंदा कुलकर्णी यांनी गोष्टीच्या माध्यमातून महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडला. याप्रसंगी पर्यवेक्षक अशोक कोठावदे, पर्यवेक्षक मधुकर पगारे, शिक्षक प्रतिनिधी दिलीप पवार, विजय मापारी, भास्कर कर्डिले, तानाजी जाधव, गोकुळ ढोले व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
शहर राष्टवादीकडून फुलेंना आदरांजली
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले, महात्मा फुले हे थोर विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा व अस्पृश्य मुलांसाठी पुण्यातील भिडे वस्तीत शाळा उघडली. स्त्री व शुद्र यांच्या शिक्षणाची परवड थांबवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी अविरतपणे केले. त्यामुळेच आज पतित स्त्रियांचा उद्धार तसेच अनाथ, अर्भक यांचे संरक्षण व संवर्धन यांचा शासनप्रणीत कार्यक्रम सुरू झालेला आहे. सरकारला क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या अष्टपैलू गुणांचा अभ्यास करण्याची गरज आहे. याप्रसंगी अनिता भामरे, पद्माकर पाटील, अनिल परदेशी, संदीप शिंदे, किरण पानकर, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, सुनील घुगे, गणेश चबरे, भाई कंसारा, गणेश अहिरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिक भाजपा
महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी भाजपा कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके व मध्य पश्चिम मंडलचे अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुजाता करजगीकर, भारती बागुल, नंदकुमार देसाई, माणिकराव देशमुख, गणेश कांबळे, अरु ण शेंदुर्णीकर, शैलेश जुन्नरे, धनंजय पुजारी, राजू मोरे, सोनल दगडे, अशोक गालफाडे, रवींद्र भालेराव, सुखदेव ढिकले, देवेंद्र चुंभळे, विजय कुलकर्णी, नितीन कार्ले, यश जंगम आदी उपस्थित होते. आभार वसंत उशीर यांनी मानले.