वणीत टमाटा मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:28 PM2020-02-21T18:28:58+5:302020-02-21T18:30:17+5:30
टमाटा दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. येथील कृषिमालास अपेक्षित भाव मिळण्याच्या आशा धूसर होत आहेत.
वणी : टमाटा दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. येथील कृषिमालास अपेक्षित भाव मिळण्याच्या आशा धूसर होत आहेत. टमाट्यापासून सॉस तयार करणाºया कंपन्यांकडे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून उत्पादकांनी धाव घेतली आहे.
हंगामाच्या प्रारंभी टमाट्याला समाधानकारक दर मिळत होते. त्यामुळे उत्पादकांचा उत्साह दुणावला होता. उत्तरोत्तर भाव वाढण्याचा अंदाज वर्तविला जात असताना गेल्या काही दिवसांपासून टमाट्याच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत उत्पादक सापडले आहेत. परिसरात व तालुक्याच्या हजारो एकर शेतीक्षेत्रात टमाट्याची प्रचंड लागवड करण्यात आली होती. त्यामुळे मोठी आवक बाजारात झाली. मागणीत घट आली. परिणामी दर घसरणीवर झाला.
लागवडीपासून उत्पन्नापर्यंतच्या खर्चाचा अंदाज बांधल्यास आजच्या दराने उत्पन्नाचा ताळमेळ बसणे अवघड आहे. टमाट्याची खुडणी व वाहतूक खर्चही अंगावर पडू लागला आहे. त्यामुळे सदरचा टमाटा सॉस तयार करणाºया कंपन्यांमध्ये विक्र ीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सॉस कंपनीत अत्यल्प दराने टमाटा विक्र ी व्यापाºयांच्या माध्यमातून नाइलाजाने करावी लागत असून, हंगामाच्या पूर्वार्धातील अपेक्षा दराच्या बाबतीत उत्तरार्धातही पूर्ण झालेल्या नसल्याने टमाटा उत्पादक हताश व निराश झाले आहेत.