ज्येष्ठ मल्लांनी गाजविला कुस्तीचा आखाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 05:09 PM2019-05-15T17:09:45+5:302019-05-15T17:09:59+5:30
नामपूर : बदलत्या जीवनशैलीत जरी कुस्ती हा खेळ मागे पडला असला तरी या गावात दरवर्षी नित्यनियमानुसार दीपावली व भवानी मातेच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते. जुन्या मल्लांपैकी आजही केदा लोटन मोरे, जगन्नाथ रामचंद्र काकडे, विजय राऊत यांनी गावाची शेकडो वर्षांची परंपरा कायम राखत आजही कुस्त्यांची परंपरा कायम टिकविली आहे.
नामपूर : बागलाण तालुक्यातील बिजोरसे येथे आई भवानी माता यात्रा उत्सवानिमित्त गावातील चौकात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. बागलाण तालुक्यातील बिजोरसे गाव पूर्वीपासून कुस्त्यांच्या तालमीत प्रसिद्ध गाव आहे. रोख स्वरूपात उत्तम कुस्तीपटूंना बक्षिसे दिली जातात. यंदाच्या कुस्ती आखाड्याचे पहिले विजेते विजय राऊत व जगन्नाथ काकडे घोषित झाले असून, केदा काकडे यांनी त्यांना एक हजार रु पयांचे रोख बक्षीस दिले आहे. आजची तरु ण पिढी व्यसनाला बळी पडत असून, हा आखाडा यशस्वी करण्यासाठी सरपंच बाळकृष्ण पवार, केदा मोरे, शशिकांत काकडे, कैलास काकडे, सुरेश काकडे, शांताराम केदारे, बंडू काकडे, शिवाजी खैरनार, नानाजी रौंदळ,अभिमन काकडे, शांताराम केदारे, बंडू काकडे, शिवाजी खैरनार, नानाजी रौंदळ, अभिमन काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. तरु णांना लाजविणाऱ्या या ज्येष्ठ कुस्तीबाबत चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे.
प्रतिक्रि या :
सन १९४६ साली भारताला स्वातंत्र्य नव्हते. माझे वय १० वर्ष होते तेव्हापासून जिल्हाभरात आजपर्यंत सुमारे एक हजारापेक्षा जास्त वेळा कुस्त्या खेळून विजयी झालो आहे. आज माझे वय ८० पेक्षा जास्त असूनही कुस्त्या खेळण्याचा मोह आवरला जात नाही. या खेळामुळेच माझी प्रकृती ठणठणीत असून, आजच्या तरु णांनी या खेळाकडे लक्ष घातले पाहिजे.
- जगन्नाथ काकडे, ज्येष्ठ पहिलवान