महिलांच्या कुस्तीची ‘क्र ेझ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:35 PM2020-02-23T22:35:58+5:302020-02-24T00:54:42+5:30
जालखेड येथे स्वांतत्र्यवीर सावरकर तालीम संघ व राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल झाली. महिला पहिलवानांच्या कुस्त्यांनी या स्पर्धांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
दिंडोरी : तालुक्यातील जालखेड येथे स्वांतत्र्यवीर सावरकर तालीम संघ व राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल झाली. महिला पहिलवानांच्या कुस्त्यांनी या स्पर्धांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
दिंडोरी-तालुक्यातील जालखेड येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजल्या. त्या महिला पहिलवानांच्या कुस्त्यांनी नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील महिला कुस्तीपटू सहभागी झाल्या होत्या. कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. महिला कुस्तीपटूंच्या चित्तथरारक कुस्त्या याठिकाणी बघावयास मिळाल्या.
यावेळी चिंतामण पाटील मोरे, प्रकाश मोरे, चिंतामण (पप्पू) मोरे, रावसाहेब मोरे, दत्तू मोरे, सुदाम मोरे, नाना मोरे, जीवन मोरे, अर्जुन मोरे, अमोल मोरे, गोविंद मोरे, नीलेश मोरे, संतोष मोरे, दादा ढिकले, नारायण मोरे, कृष्णा मोरे, गोटीराम मोरे, अंकुश मोरे, विनोद मोरे, उद्धव मोरे, बबन मोरे आदींसह पंचमंडळीनी विशेष परिश्रम घेतले.
चांदीची गदा, अकरा हजार रुपये रोख बक्षीस
या स्पर्धेत प्रथम विजेतेपद कुस्तीपटू चांदवड येथील धर्मा शिंदे याने पटकावले असून, जालखेड येथील कचरू विठोबा पवार यांच्याकडून कै. विठोबा पंढरीनाथ पवार यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा देण्यात आली, तर रोख रक्कम अकरा हजार रुपये बक्षीस गणपतबाबा पाटील यांच्यातर्फेविजेत्यास देण्यात आले. तसेच या स्पर्धेत उपविजेता ज्ञानेश्वर खेमनार हा ठरला. ग्रामीण भागातील महिलांच्यादेखील स्वतंत्र कुस्ती स्पर्धा झाल्या.