चौंधाणे येथे रंगली कुस्त्यांची दंगल
By admin | Published: May 9, 2016 11:20 PM2016-05-09T23:20:33+5:302016-05-09T23:31:50+5:30
चौंधाणे येथे रंगली कुस्त्यांची दंगल
वटार : चौंधाने येथे ग्रामदैवत प.पू. रामगीरबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वात मोठी कुस्ती गावामार्फत नीलेश पाळके (सटाणा) व अनिल वाघ (येवला) यांच्यात रंगली. या कुस्ती दंगलीसाठी कसमादे पट्ट्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून पहिलवानांनी हजेरी लावली होती. इतर कुस्त्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या रंगल्या होत्या. त्यात बाहेरगावाहून आलेल्या पहिलवानांना नाराज होऊ न देता प्रत्येक पहिलवानाला कुस्ती खेळण्याची संधी देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला होता, अशी माहिती सरपंच राकेश मोरे यांनी दिली.
यावेळी सटाणा पोलीस निरीक्षक शब्बीर शेख, पोलीस हवालदार देवरे, सरपंच राकेश मोरे, माजी सरपंच पुंजाराम मोरे, नंदकिशोर मोरे, संतोष मोरे, दादा निकम, दादा बागुल, बाळू मोरे, कडू मोरे आदी उपस्थित होते. कुस्त्यांचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते. यावेळी भगवान मोरे, प्रकाश मोरे, देवीदास बागुल, किशोर मोरे, प्रदीप मोरे, लाल मोरे, दत्तू पहिलवान आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.