दिव्यांग विद्यार्थ्यांना पालकांच्या समुपदेनातून लेखनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:42+5:302021-03-09T04:17:42+5:30

दहावीतील ५८२, तर बारावीतील ४७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश विद्यार्थी नेत्रहिन, हात, हाताची बोटे अत्यंत कमजोर ...

Writer from parental community to disabled students | दिव्यांग विद्यार्थ्यांना पालकांच्या समुपदेनातून लेखनिक

दिव्यांग विद्यार्थ्यांना पालकांच्या समुपदेनातून लेखनिक

Next

दहावीतील ५८२, तर बारावीतील ४७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश विद्यार्थी नेत्रहिन, हात, हाताची बोटे अत्यंत कमजोर असणारी आहेत. अशा दिव्यांगासाठी परीक्षा देण्याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ‘लेखनिक’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे ही सुविधा मिळणे कठीण असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित शाळांकडून खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे समुपदेशन करून लेखनिक विद्यार्थी उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र शासनाने यासंबंधी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांमधून होत आहे.

एकूण दिव्यांग परीक्षार्थी - १०५४

दहावीतील विद्यार्थी -५८२

बारावीतील विद्यार्थी - ४७२

पालकांच्या समुपदेशनातून लेखनिक

नॅबच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना त्या ज्या शाळेत जातात. त्या शाळेतून लेखनिक मिळतो. यावर्षीही सर्व मुलींना लेखनिकाची सुविधा शाळेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- वैशाली साळुंखे, मुख्याध्यापक, नॅब स्कूल

--

नॅबच्या दहावीतील चार विद्यार्थिनी आमच्या शाळेत आहेत. या सर्व विद्यार्थिनींना दरवर्षीप्रमाणे लेखनिकाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकांचे समुपदेशन करून लेखनिक विद्यार्थी तयार होतात.

- हरिश्चंद्र शेजवळ, शिक्षक, वैशंपायन विद्यालय

--

--

सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित शाळांना सूचना करण्यात आल्या असून, शाळा त्यांच्याच शाळेतील खालच्या वर्गातील विद्यार्थी लेखनिक म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपल्बध करून देत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Writer from parental community to disabled students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.