सामाजिक आसक्तीतूनच घडतो लेखक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:54 AM2017-09-25T00:54:14+5:302017-09-25T00:54:18+5:30

सामाजिक होणं ही आपली आसक्ती असायला हवी. सामाजिक होण्याच्या आसक्तीतूनच लेखक जन्मतो आणि घडत जातो. लेखक नाहीच घडला तर निदान माणूस तरी घडायला हवा, असे मत नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी रविवारी (दि. २४) सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

 Writer from the social awakening happens | सामाजिक आसक्तीतूनच घडतो लेखक

सामाजिक आसक्तीतूनच घडतो लेखक

Next

नाशिक : सामाजिक होणं ही आपली आसक्ती असायला हवी. सामाजिक होण्याच्या आसक्तीतूनच लेखक जन्मतो आणि घडत जातो. लेखक नाहीच घडला तर निदान माणूस तरी घडायला हवा, असे मत नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी रविवारी (दि. २४) सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. दोनदिवसीय जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसºया दिवसाच्या सत्राचे उद्घाटन मेळाव्याचे अध्यक्ष नाट्यलेखक दत्ता पाटील यांच्या बीजभाषणाने झाले. वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दत्ता पाटील यांनी साहित्यासह विविध विषयांना हात घालत आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य केले. आपल्या सभोवताली एकमेकांना नाकारणारी नवी व्यवस्था तयार व्हायला लागली असून, चर्चा आणि वाद यातील सीमारेषा पुसल्या गेल्या आहेत. चर्चा म्हणजेच वाद असे नवीन समीकरण तयार होऊ लागले आहे, हे सांगताना दत्ता पाटील यांनी सोशल मीडियावर जातीधर्मावरून, राजकारणावरून चाललेल्या उन्मादयुक्त व्हर्च्युअल दंगली डोळ्यांना सहजपणे दिसत असल्याचे सांगितले. चर्चेच्या पलीकडे पोहचलेले नेटिझन्स अतिशय उन्मादाने वावरत असून, ही एकप्रकारची हिंसाच आहे आणि ती शारीरिक हिंसेपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगताना अशा व्यवस्थेवर ज्यांनी नियंत्रण राखायला हवे, अशा यंत्रणाच सोशल माध्यमांच्या पोशिंद्या आहेत हे ठळकपणे अधोरेखित केले तसेच आजच्या लेखकांच्या पिढीला याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे आवाहन केले. जागतिकी करणानंतर खेडोपाडी अनेक स्थित्यंतरे बघायला मिळू लागली आहेत, मातीशी घट्ट नाळ असल्याशिवाय समकालीन भान येत नाही. अलीकडच्या काळात मातीतले लिहिणाºयांना पुरस्कारांच्या पातळीवर बसवत तातडीने त्यांना संपवून टाकण्याची घाई झाली असल्याचेही सांगितले. साहित्याची समाजकारण, राजकारणापासून फारकत होऊच शकत नाही तसेच जीवनशैलीवर राजकीय आणि जातीपातीच्या, धार्मिकतेच्या उन्मादी वातावरणाचा मोठा प्रभाव आहे हे वास्तव नाकारून चालत नाही तसेच आपल्याला या गोष्टींपासून अलिप्त राहताच येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण होऊ लागली आहे. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष अ‍ॅड अभिजीत बगदे, सांस्कृतिक कार्यसचिव जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह आमदार देवयानी फरांदे आणि सुहास फरांदे उपस्थित होते.

Web Title:  Writer from the social awakening happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.