विशिष्ट काळातील लिखाणासाठी घ्यावी लागते प्रचंड मेहनत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:21+5:302021-02-05T05:35:21+5:30
कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी (दि.३१) या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पाटील यांनी अशा प्रकारचे लिखाण ...
कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी (दि.३१) या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पाटील यांनी अशा प्रकारचे लिखाण करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत असून, त्यासाठी लेखकाला त्या काळाशी तादात्म्य पावणे आवश्यक असल्याचे सांगितले. दशोराज्ञ कादंबरीच्या निमित्ताने लेखिकेने अत्यंत कमी वयात अवघड विषयाला हात घालून अत्यंत दर्जेदार साहित्यनिर्मिती केल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. कवी कमलाकर देसले यांनी याप्रकारच्या लिखाणातून लेखिकेची भव्यता, दिव्यता आणि गुढता याबद्दलची ओढ दिसून येत असल्याचे सांगितले. तसेच प्राचीन आणि समकालीन अशा लिखाणाचा या कादंबरीतून उत्तम मिलाफ बघायला मिळत असल्याचेही देसले यांनी अधोरेखित केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रकाशक नितीन हिरवे, राजेंद्र लाखे, दत्ता गोवर्धने, वसंत जगताप यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. लेखिका डॉ. क्षमा गोवर्धने शेलार यांनी त्यांच्या मनोगतातून पुस्तक निर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगत कष्टाचे चीज झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रतिभा गोवर्धने यांनी, तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.
फोटो
३१पुस्तक प्रकाशन
दशोराज्ञ कादंबरीच्या प्रकाशनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील. समवेत डॉ. संजय शेलार, डॉ. क्षमा गोवर्धने शेलार, कमलाकर देसले, वसंत जगताप, जयप्रकाश जातेगावकर, नितीन हिरवे.