वीजमीटर बदलण्यासाठी लावतात चुकीचे निकष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:48 AM2019-05-18T00:48:20+5:302019-05-18T00:48:42+5:30
ग्राहकाला येणारे वीज बिल आणि मीटर रिडिंगबाबत शंका आल्यास स्थानिक पातळीवरील वीज कर्मचारी ग्राहकाला वीजमीटर बदलण्याचा परस्पर सल्ला देतात. यामुळे ग्राहकाला नाहक भुर्दंड सहन करावा लागतोच
नाशिक : ग्राहकाला येणारे वीज बिल आणि मीटर रिडिंगबाबत शंका आल्यास स्थानिक पातळीवरील वीज कर्मचारी ग्राहकाला वीजमीटर बदलण्याचा परस्पर सल्ला देतात. यामुळे ग्राहकाला नाहक भुर्दंड सहन करावा लागतोच शिवाय वीज कार्यालय आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या नाहक हातापाया पडण्याचीही वेळ येते. एव्हढे करूनही वीजमीटर वेळेत मिळत नसल्याचा सर्वसामान्य ग्राहकांचा अनुभव असताना महावितरणनेच आता अशा कर्मचाऱ्यांची ही मनमानी उघड केली आहे. मीटर बदलण्याचे निकष हे प्रमाणित नसतानाही कर्मचारीच चुकीचे निकष लावून मीटर बदलत असल्यास यापुढे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे संकेत मुख्यालयाने दिले आहेत.
ग्राहकांबरोबरच सुसंवाद निर्माण करण्यासाठी महावितरणकडून अनेकविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत. विशेषत: ग्राहकांचे वीज बिल आणि मीटर रिडिंगबाबतच्या तक्रारी कमी करण्यासाठी अनेक योजना महावितरणकडून राबविण्यात आलेल्या आहेत. वेळोवेळी या यंत्रणा सक्षम करण्यासाठीच्या आधुनिक यंत्रणादेखील राबविण्यात आलेल्या आहेत. असे असले तरी ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचे प्रकार समोर येतात. त्याचा भाग म्हणजे वीजमीटर बदलणे हा एक आहे.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीटर बदलण्याची प्रक्रिया स्थानिक पातळीवरील शाखा कार्यालयामार्फत करण्यात येते. यामध्ये मीटर बदलण्याचे निकष हे प्रमाणित नसल्याने सदर मीटर
मीटर संदर्भातील गैरप्रकाराला पुष्टी
वीजमीटर संदर्भात ग्राहकांना तांत्रिक माहिती असणे शक्य नाही किंवा त्याचे तसे कारणही नाही. महावितरणच्या कोणत्याही अधिकारी, कर्मचाºयांने मीटर बदलण्याचे सांगितल्यास ग्राहकाला तसे करणे भाग पडते. ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आल्याचा अहवाल फुगवून मुख्यालयाकडे पाठविण्यामागेदेखील मोठे षडयंत्र असल्याचे प्रथमदर्शनी समोर आलेले आहे. त्यामुळे यापुढे मीटर बदलण्याची प्रक्रिया यापुढे केंद्रीय प्रणालीनुसारच होणार आहे.