जिल्हा परिषदेत चुकीच्या गोष्टी घडल्या

By admin | Published: February 1, 2017 10:20 PM2017-02-01T22:20:07+5:302017-02-01T22:20:21+5:30

अजित पवार : भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका

The wrong things happened in the Zilla Parishad | जिल्हा परिषदेत चुकीच्या गोष्टी घडल्या

जिल्हा परिषदेत चुकीच्या गोष्टी घडल्या

Next

नाशिक : जिल्हा परिषदेत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याऐवजी चुकीच्या लोकांना महत्त्व दिले गेल्याने पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळांवर शरसंधान साधले.
वास्तविक राज्यात सर्वच समविचारी पक्षांशी आघाडी असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉँग्रेस सोडून अन्य लहान पक्षांना नको तितके महत्त्व दिल्याने त्यांनी जिल्हा परिषदेत पाठिंबा देताना ‘निगोसिएशन’ करीत पदे मिळविल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. आम्हाला पक्षाने प्रत्येकासाठी क्षेत्र ठरवून दिले आहेत. मला सातारा पालकमंत्री आणि अन्य ठिकाणी काम दिल्याने आपण तिथे काम केले.
आम्ही कोणाच्या कामात लुडबूड करीत नाही, मात्र नाशिकला जे झाले चुकीचे झाले, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. पक्षाने भुजबळांना काय कोणालाच वाऱ्यावर सोडलेले नाही. माझ्यासकट सुनील तटकरे यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. आम्ही चौकशीला सहकार्य करीत आहोत. आम्ही वकिलांच्या सल्ल्याने काम करीत आहोत. आज भुजबळ तुरुंगात असल्याने ते दोषी ठरत नाहीत. मात्र तुरुंगातील व्यक्तीविषयी जनतेच्या मनात पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, असे सांगत त्यांनी भुजबळांची प्रतिमा पक्षाच्या फलकांवरून हटविण्याचे अप्रत्यक्षरीत्या एकप्रकारे समर्थनच केले. भुजबळांसह दोन्ही माजी खासदार तुरुंगात असल्याने पक्षाला स्थानिक नेतृत्व उरले नसल्याबाबत विचारणा केली असता, पक्ष कोणा एकावर चालत नसतो.
स्व. आर. आर. पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे नेते होते. त्यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी व मुलगी राष्ट्रवादीचे काम पाहत आहे. पक्षाने धनंजय मुंडे यांच्यासारख्या युवकांना विरोधी पक्षनेते पद देऊन मोठी जबाबदारी सोपविली असून, ते ती योग्यरीत्या पार पाडत आहे. पक्षाने आता युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The wrong things happened in the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.