बिटको रुग्णालयात एक्स-रे मशीन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:14 AM2019-06-22T00:14:25+5:302019-06-22T00:14:30+5:30
नाशिकरोड : बिटको रुग्णालयातील डिजिटल एक्स-रे मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. बिटको रुग्णालयात ...
नाशिकरोड : बिटको रुग्णालयातील डिजिटल एक्स-रे मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
बिटको रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाकडून जुन्या एक्स-रे मशीनसोबत नवीन डिजिटल एक्स-रे मशीन लावण्यात आले होते. यामुळे डॉक्टरांनादेखील उपचार करताना मोठा फायदा होत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून नवीन डिजिटल एक्स-रे मशीन नादुरुस्त झाल्याने बंद पडले आहे. यामुळे जुन्या एक्स-रे मशीनवर कामाचा ताण वाढला असून, यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. मनपा प्रशासनाने लक्ष घालून गोरगरीब रुग्णांच्या सोयीसाठी त्वरित नवीन डिजिटल एक्स-रे मशीन सुरू करावे, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.