बारावी परीक्षा ; नाशिक विभागातील जळगावात सर्वाधिक कॉपी प्रकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:47 PM2019-02-24T13:47:35+5:302019-02-24T13:55:33+5:30
बारावीची परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून या पहिल्या तीन दिवांसामध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून त्यानंत सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहे.शिक्षण विभागाचे कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी अभियान सुरू असून त्यासाठी विभागस्तराव २८ भरारी पथके कार्यरत असताना जळगावमध्ये तीन दिवसात तब्बल ३१ कॉपी प्रकरणे समोर आल्याने सद्या नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.
नाशिक : बारावीची परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून या पहिल्या तीन दिवांसामध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून त्यानंत सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहे.शिक्षण विभागाचे कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी अभियान सुरू असून त्यासाठी विभागस्तराव २८ भरारी पथके कार्यरत असताना जळगावमध्ये तीन दिवसात तब्बल ३१ कॉपी प्रकरणे समोर आल्याने सद्या नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.
बाराीवीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला १८ कॉपी बहाद्दरांवर कारवाई झाली होती. यात जळगावच्या सर्वाधिक १४ जणांचा समावेश होता. तर धुळ््यातून चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते. तर दुसºया दिवशी दुसऱ्या दिवशी हिंदीच्या पेपरला पकडलेले सर्वच्या सर्व पाच कॉपीबहाद्दर जळगावचेच होते. त्यानंतर शनिवारी (दि.१३) झालेल्या मातृभाषेच्या पेपरलाही जळगावमध्येच सर्वाधिक कॉपी १२ प्रकरणे समोर आल्याने आतापार्यंत झालेल्या तीन विषयाच्या पेपरमध्ये एकूण २५ कॉपी प्रकरणांपैकी जळगावमधील सर्वाधिक ३१ प्रकरणांचा समोर असून धुळयातील चार प्रकरणांचा समावेश आहे.विशेष म्हणजे नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या दिवसापासून एकही कॉपी प्रकरण समोर आलेले नाही. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांची कॉपी मूक्त परीक्षेकडे यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे यातून दिसते.
कॉपी रोखण्याचे आव्हान
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेस गुरुवारी (दि.२१) इंग्रजी विषयाच्या पेपरने प्रारंभ झाला. विभागातील ६७ हजार ३५८ विद्यार्र्थ्यांनी हा पेपर दिला. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२२) विभागातील ३६ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात हिंदी, तर दुपार सत्रात ७४८ विद्यार्थ्यांनी पर्शियन भाषेचा पेपर दिला.परीक्षेच्या तीसºया दिवशी शनिवारी (दि.२३) सकाळच्या सत्रात एकूण १ लाख २३ हजार ७८ विद्यार्थ्यांनी मराठीचा तर दुपार सत्रात विभागातील ७ हजार ५०५ विद्यार्थी उर्दु भाषेचा पेपर दिला. परीक्षेच्या पहिल्या तीन दिवसातच जळगामध्ये एकूण ३१ कॉपीप्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे विभागीय शिक्षण मंडळापुढे जळगावमधील गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२५) भौतिकशास्त्र, चिटणीसांची कार्यपद्धती व राज्यशास्त्र विषयांचे पेपर होणार आहेत.