दिंडोरी तालुक्यात यंदामुगाचे उत्पन्न वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 02:34 PM2020-08-17T14:34:53+5:302020-08-17T14:37:23+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलुन काही नगदी पिकांना प्राधान्य दिल्याने उत्पन्न भरघोस मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलुन काही नगदी पिकांना प्राधान्य दिल्याने उत्पन्न भरघोस मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, भात, नागली, मका, मुग,उडीद खुरसणी इ.पिकांनी चांगला बहर घेतल्याने शेतकरी वर्गाला खरीप हंगाम साथ देईल. असे चित्र दिंडोरी तालुक्यातील बरीच गावांमध्ये पाहायला मिळत आहे. मागील वर्षी खरीप हंगामात मुगाने शेतकरी वर्गाची निराशा केली होती. त्यामुळे यंदा मुग पिक घ्यावे की नाही. अशी व्दिधा अवस्थेत बळीराजां सापडला होता. परंतु मुग पिकाला वातावरण पोषक झाल्याने शेतकरी वर्गाने मुग घेण्याकडे कल दिला. सध्या तालुक्यात भिज स्वरु पाचा पाऊस पडत असल्यामुळे या पिकावरील विविध रोग ,तुडतुडे, वेगवेगळ्या स्वरूपाची आळी,किड,या प्रभाव दिसत नसल्यामुळे बळीराजांच्या कष्टाला फळ मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
सध्या मुग या पिकाने चांगला बहर घेतल्याने शेतकरी वर्गाला यंदाच्या खरीप हंगाम चांगली साथ देईल अशी आशा निर्माण झाली आहे. सध्या मुग या पिकाला कुठल्याही प्रकाराचा रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झालेला नाही. त्यामुळे अशी हमी भाव देणारे पिके वाचविण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करु न हे पिके वाचविण्यासाठी जीवाचेरान करीत आहे.
भीज पावसामुळे मका पिकाला धोका निर्माण झाला आहे. मका जास्त प्रमाणात वाढल्यामुळे पाण्याचे वजन व वारे वाहत असल्यामुळे वाढलेली मका आडवी पडायला सुरु वात झाल्यामुळे शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे यंदा खरीप हंगामातील मका पिकावर संक्र ांत येते की काय अशी भीती शेतकरी वर्गाला वाटत आहे.
शेतकरी वर्गाने यंदा आपले रब्बी हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी खरीप हंगामावर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, मका, भुईमूग, नागली, खुरसणी, भात, उडीद इ. पिकांनी शेतकरी वर्गाला साथ द्यायला सुरु वात केली आहे.
शेतकरी वर्गाला हमी भाव मिळुन देणारे टोमॅटो पिकाला चांगली फळ धारणा झाल्याने तसेच ३ ते ४ टक्के शेतकरी वर्गाची टोमॅटो बाजारपेठेत येऊ लागल्याने भर पावसातही तारे वरची कसरत करून शेतकरी टोमॅटोचे कॅरेट बाजारपेठेत नेत आहेत.