राज्य सरकारच्या विरोधात युवक कॉँग्रेसचे ‘निषेधासन’

By श्याम बागुल | Published: October 31, 2018 02:48 PM2018-10-31T14:48:35+5:302018-10-31T14:49:04+5:30

राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारच्या कारकिर्दीला बुधवारी चार वर्षे पुर्ण झाली असून, या सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या घोेषणा व आश्वसनांची पुर्तता केली नसल्याने या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा युवक कॉंग्रेसने केली होती.

Yash Congress's 'prohibition' against the state government | राज्य सरकारच्या विरोधात युवक कॉँग्रेसचे ‘निषेधासन’

राज्य सरकारच्या विरोधात युवक कॉँग्रेसचे ‘निषेधासन’

googlenewsNext
ठळक मुद्देचार वर्षपुर्ती : सकाळी योगासने करून घोषणाबाजी

नाशिक : राज्य सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या विविध घोषणांची पुर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढणारी वेगवेगळ्या प्रकारची बारा आसने करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारच्या कारकिर्दीला बुधवारी चार वर्षे पुर्ण झाली असून, या सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या घोेषणा व आश्वसनांची पुर्तता केली नसल्याने या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा युवक कॉंग्रेसने केली होती. केंद्र व राज्य सरकारला योगाची भाषा अधिक कळ ते त्यामुळे योगाच्या माध्यमातूनच निषेधासन करून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता गोल्फ क्लब मैदानावर जमलेल्या कॉँग्रेसजनांची अगोदर राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून मैदानात आसने करण्यास सुरूवात केली. त्यावेळी ‘कर्जमाफी कधी मिळणार, अभ्यास सुरू आहे’, ‘रोजगार कधी मिळणार, अभ्यास सुरू आहे’अशा प्रकारची उपहासात्मक घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून शेतकºयांच्या हितासाठी सरकारला सुुबूद्धी मागणारी प्रार्थना करण्यात आली. या आंदोलनात कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, उद्धव पवार, सुरेश मारू, युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील आदी सहभागी झाले होते.

 


चौकट===
अशी केली निषेधासन...
मराठा, धनगर आरक्षण, शेतक-यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अभ्यासासन; फसवी कर्जमाफी, शिवराय, डॉ. आंबेडकर स्मारकाच्या विषयी घोषणासन किंवा गाजरासन; मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी न करता त्यांना क्लिनचिट दिल्याने क्लिनचिटासन; शेतक-यांविषयी अपशब्द काढणा-या मंत्र्यांच्या विरोधात वाचाळासन; महामार्ग कमी न केल्याच्या निषेधार्थ महागाईसन; रोजगार निर्मिती न केल्याच्या प्रश्नावर बेरोजगारासन; अंधभक्तांसाठी भक्तासन; सोशल माध्यमातील पेड ट्रोलाच्या विरोधात ट्रोलासन; खोटे आश्वासन दिल्याने फसवणीसासन; प्रत्येक पश्नावर दिल्या जाणा-या धमकीच्या निषेधार्थ धमकीआसन; दुष्काळ प्रश्नी सदृष्य शब्द वापरल्याने अंशत: सन; राफेल प्रकरणात अंबानीला मदत केल्याने राफेलासन यावेळी करण्यात आले.
 

Web Title: Yash Congress's 'prohibition' against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.