यात्रोत्सव : सातपूरला आज बारा गाड्या ओढणार
By admin | Published: March 27, 2017 07:22 PM2017-03-27T19:22:02+5:302017-03-27T19:22:02+5:30
सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील गुढीपाडव्यानिमित्त सातपूर गावात भवानी मातेचा यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सातपूर : सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील गुढीपाडव्यानिमित्त सातपूर गावात भवानी मातेचा यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात्रोत्सवानिमित्त बारा गाड्या ओढण्याचा मान यावर्षी मंगेश प्रकाश निगळ या युवकास देण्यात आला आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष पोपट बंदावणे यांनी दिली.
गेल्या १३० वर्षांपासून सातपूर गावात भवानी मातेचा यात्रोत्सव गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात यात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. यात्रोत्सवानिमित्त बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. बारा गाड्या ओढणाऱ्यास श्रीगणेशा संबोधले जाते. हा गणेश म्हणजेच अर्धनारी नटेश्वर होय. रु ढी आणि परंपरेनुसार या गणेशाचा मान निगळ घराण्याकडे आहे. यावर्षीचा गणेशाचे रूप मंगेश निगळ यांना देण्यात येणार आहे. बारा गाड्या ओढल्यानंतर भवानी मातेच्या यात्रोत्सवास प्रारंभ होत असतो.