यंदा गणेशोत्सवावरही दिसणार कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:17 PM2020-06-16T22:17:19+5:302020-06-17T00:32:30+5:30
नाशिक : हातावर पोट असणाऱ्या कामगारांबरोबरच गणेशमूर्ती साकारणाºया मूर्तिकारांनाही कोरोनाची झळ सोसावी लागत आहे. गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही.
नाशिक : हातावर पोट असणाऱ्या कामगारांबरोबरच गणेशमूर्ती साकारणाºया मूर्तिकारांनाही कोरोनाची झळ सोसावी लागत आहे. गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्याचप्रमाणे विविध गणपती मंडळांनी यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे देखावे तयार करणाºया शिल्पकांरांच्या व्यावसायिकांवरही बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.
लॉकडाऊनमुळे गुजरातमधून येणारा कच्चा माल येण्यास विलंब होत आहे. रेड झोन वगळता अन्य ठिकाणी लॉकडाऊनची नियमावली शिथिल करण्यात आली असली तरी व्यावसायिकांकडे कच्चा मालच उपलब्ध होत नसल्याने पुरवठा करण्यात अडचणी येत होता. आता हळूहळू कच्चा मालाचा पुरवठा होऊ लागला असला तरी वाढलेला वाहतूक खर्च व मनुष्यबळ यामुळे मूर्तिकारांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या तीन-चार महिने आधी मूर्तिकार कामास सुरुवात करतात.
यंदाचा गणेशोत्सव २२ आॅगस्टला सुरू होणार आहे; परंतु मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा मालच कारागिराकडे नाही. शाडूची माती, प्लास्टर आॅफ पॅरिस, मातीमध्ये मिसळण्यासाठी काथ्या हा कच्चा स्वरूपातील माल गुजरात व राजस्थान येथून मागविला जातो. त्याचबरोबर लागणारे रंग मुंबई येथून आणले जाते.
या कामाला दरवर्षी एप्रिलपासूनच सुरुवात होते; परंतु यंदा मूर्ती तयार करण्यासाठी हाताशी काचा माल वेळीच उपलब्ध झाला नसल्याने सध्या जवळ असलेल्या मातीतूनच मूर्ती साकारल्या जात असल्या तरी ती संख्या कमी आहे.
------------------
मोठ्या गणेशमूर्ती नाहीच
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा मोठ्या गणेशमंडळांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश मंडळासाठी लागणाºया मोठ्या मूर्ती तयार न करण्याचा निर्णय कारागिरांनी घेतला आहे. जो शिल्लक कच्चा माल आहे, तोच छोट्या, घरगुती गणपती बनविण्यासाठी वापरला जात आहे.
शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनीही यावर्षी गर्दी टाळण्यासाठी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून मोठ्या मूर्तींऐवजी केवळ पूजेच्या छोट्या मृतींचीच प्रतिष्ठापणा करणार आहेत. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवात मोठ्या गणेशमूर्ती पाहायला मिळणे दुर्मिळ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
-------------------
गावी गेल्यामुळे कामगारांचाही तुटवडा
शाडू आणि पीओपीच्या मूर्ती घडविणारे कारागीरही कोरोनाच्या धास्तीने गावी गेले आहेत. त्यामुळे काम करण्यास कारागीर मिळत नाहीत. त्यातच रंग, ब्रश यासारखे व्यवसायाशी निगडित अनेक वस्तूंची बाजारपेठली बंद आहेत. मूर्तीच्या आॅडर्सही मूर्तिकारांकडे नाहीत. यंदा गणेशोत्साची तयारी काहीच नसून प्रत्येक जण कोरोनाशी सामना करत असल्याने गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट राहण्याची शक्यता मूर्तिकारांकडून वर्तवण्यात येत आहे.
------------------
कोरोनामुळे यावर्षी कच्चा माल उपलब्ध होण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या मूर्तींना मागणीही कमी आहे. गेल्या दोन महिन्यांत कच्चा मालाची व मूर्तींची वाहतूक होऊ शकलेली नाही, त्यामुळे मूर्तींचे रंगकाम व सजावट करण्यासाठी कारागिरांना वेळ कमी मिळणार असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मूर्तींची संख्याही कमी प्रमाणात असणार आहे.
- नूपुर जोशी, मूर्तिकार
-------------------
गणेशोत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उत्सव साधपणाने साजरा करण्यात येणार आहे. केवळ उत्सव मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून, कोणताही देखावा साकारण्यात येणार नाही.
- पोपट नागपुरे,
रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ
-------------------
मानाचा राजाची मूर्ती गेल्यावर्षी २८ फूट उंच होती. परंतु, यावेळी मोठी मूर्ती असणार नाही, केवळ उत्सव मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून आगमन सोहळाही रद्द करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे नियोजन आहे.
- सत्यम खंडाळे,
मानाचा राजा गणेशोत्सव मंडळ
----------------------
----------------
बीडी भालेकर मैदानावरील गणेशोत्सव पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी यावर्षी मोठ्या मूर्ती व देखावे टाळण्याचा मंडळांचा विचार आहे.
- शंकर बर्वे, राजे छत्रपती
कला क्रीडामंडळ