यंदा गव्हाचा खर्च वाढला मात्र उतारा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:49+5:302021-03-28T04:14:49+5:30

चौकट- जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन चांगले येत असले तरी हमीभाव केंद्रांवर मात्र गव्हाची खरेदी केली जात नाही. केंद्र शासनाने गव्हाला ...

This year, the cost of wheat has gone up but the yield has gone down | यंदा गव्हाचा खर्च वाढला मात्र उतारा घटला

यंदा गव्हाचा खर्च वाढला मात्र उतारा घटला

Next

चौकट-

जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन चांगले येत असले तरी हमीभाव केंद्रांवर मात्र गव्हाची खरेदी केली जात नाही. केंद्र शासनाने गव्हाला १९७५ रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला असला तरी ‌‌खुल्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांकडून सरासरी १७४१ रुपये प्रति क्वंटल दराने खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. हमी भाव केंद्रांवर गव्हाची खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडन होत आहे.

कोट-

गव्हाला थंडी आवश्यक् असते. यावर्षी थंडी खूपच कमी पडली. दरवर्षी गव्हाच्या हंगामात २० ते २५ दिवस सकाळचे तपमान १० अंश सेल्सियसपेक्षा कमी असते त्यामुळे गव्हाची वाढ होते. यावर्षी अवघे दोन ते तीन दिवसच असे वातावरण होते. तपमान वाढीचा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे यावर्षी ५ ते १० टक्कयांनी उत्पादनात घट येउ शकते. याशिवाय अनेक ठिकाणी गव्हावर तांबेरा रोग पडला त्याचाही उत्पादनाला फटका बसला. विशेषम्हणजे यावर्षी गव्हाचे क्षेत्र वाढले पण उत्पादन मागील वर्षीसारखेच राहण्याची शक्यता आहे. - डॉ. भानुदास गमे, गहू शास्त्रज्ञ, गहू संशोधन केंद्र, निफाड

Web Title: This year, the cost of wheat has gone up but the yield has gone down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.